पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा गावोगावी जागर करूया- प्रकाश सोनसळे अध्यक्ष धनगर समाज महाराष्ट्र राज्य

प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
 दि.१/९/२०२२ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक नामकरण फलकाचे पारगाव (घुमरा) येथे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी संबोधित करताना प्रकाश  सोनसळे यांनी सांगितले की अहिल्यादेवी होळकरांच्या विचारांचा जागर करण्यासाठी आपण एकत्रित आले पाहिजे आणि प्रत्येक गावागावांमध्ये अहिल्यादेवी होळकरांच्या विचारांचा जागर करूया असे संबोधित करताना म्हणाले. 
       यावेळी अहिल्यादेवी होळकर चौकाचे नामकरण फलकाचे उद्घाटन करताना मा. प्रकाश  सोनसळे अध्यक्ष धनगर समाज महाराष्ट्र राज्य व , सोपानराव गावडे, भरत गाडे, अरुण काकडे, नवनाथ डफळ, रवी माने, बाळू सोनसळे, गणेश गाडे,डफाळ साहेब, अंकुश माने,घुमरा पारगाव गावातील गाडेकर परिवार, काळे परिवार, भोजने परिवार,सोनसळे परिवार घुमरा पारगावचे सरपंच, माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य व राजकीय क्षेत्रातील  नेतेमंडळी, पंचक्रोशीतील  नागरिक उपस्थित होते.

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात