ब्राईट स्टार इंग्लीश स्कुलचे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत घवघवीत यश, सााई अजय कांबळेची विभागीय स्पर्धेसाठी निवड
परतुर प्रतिनिधी अजय कांबळे
जालना येथील भारत शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथे दिनांक 18 नोव्हेंबर शुक्रवार रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत येथील ब्राईट स्टार इंग्लीश स्कुलचा विद्यार्थी साई अजय कांबळे इयत्ता आठवी याने स्पर्धेत बाजी मारत घवघवीत यश संपादन केले आहे. त्याची औरंगाबाद येथे होणाऱ्या विभागीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या निवडीबद्दल मा.आ.सुरेशकुमार जेथलिया,मा.नगरसेवक बाबुराव हिवाळे,राजेश भुजबळ,राजेश खंडेलवाल संचालक शेख शब्बीर, श्री भालेराव, मुख्याध्यापक शंकर खनके सर्व शिक्षक वृंदासह ,तालुका पञकार संघ व राज्य मराठी पञकार संघाने अभिनंदन केले आहे संपादक तसेच पञकार अजय कांबळे यांचा साई मुलगा आहे.
Comments
Post a Comment