दत्तात्रय खुळे यांना राष्ट्रीय साहित्यरत्न पुरस्कार

तळणी प्रतीनीधी रवी पाटील
      तळणी येथील युवा कवी साहीत्यीक दत्तात्रय खुळे यांचा राष्ट्रीय साहित्यरत्न पुरस्काराने सम्मान
साहित्य क्षेत्रातील दत्तात्रय खुळे अनेक राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रथम क्रमांक पटकावले आहेत याआधी त्यांना समाजभूषण , काव्यगौरव पुरस्कार , ऑथर ऑफ द इअर अशा अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. एच पी गॅस तळणी येथे व्यवस्थापक पदावर कार्यरत असताना आपली नोकरी सांभाळून आपला छंद जोपासणारा उमदा कवी दत्तात्रय खुळे यांना आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहु उद्देशीय संस्थेच्या वतीने राष्ट्रीय साहित्यरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे येथील हिवाळी अधिवेशनात सेवा निवृत्त पोलीस महानिरीक्षक डॉ विठ्ठलराव जाधव , माजी महापौर उषाताई ढोरे, प्रादेशिक वन परिक्षेत्र अधिकारी सौ शीतल नगराळे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ मधूसुदन घाणेकर,संस्थेचे अध्यक्ष देवा तांबे सर आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. ग्रामीण भागात आजही विविध क्षेञा मध्ये छाप टाकणारे तरुण पूढे येत असून त्याना खरी गरज आहे ती व्यासपीठाची कलेचे सादरी करण करण्यासाठी आजही कित्येक तरुण ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे यापैकी एक दत्तात्रय खूले अगदी गरीब कुंटूबांतील हा कवी गावाचे व परीसराचे नाव मोठे करत आहे आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहु उद्देशीय संस्था या संस्थेचे हिवाळीअधिवेशन 2022 आकृडी पुणे येथे उत्साहात पार पडले
आंतरराष्ट्रीय संस्थापक देवा तांबे, सचिव दीपक काळे , सुभाष हजारे आदींनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या . हा पुरस्कार मिळाल्या बद्दल महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय तळणी तसेच तळणी ग्रामस्थांच्या व तळणी ग्रामपंचायत च्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला .

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.