लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

भवितव्य घडविणाऱ्या शिक्षणाची गरज- मा.आ बबनराव लोणीकर

परतुर - कैलाश चव्हाण 
   मुलाचे भविष्य घडविण्यासाठी आज चांगल्या शिक्षणाची गरज आहे. पालकांनी मुलाच्या दर्जेदार शिक्षणासाठी आग्रही राहिले पाहिजे. आजच्या युगात पुस्तके ज्ञानासोबतच विज्ञानाकडे सर्वांगीण दृष्टिकोनातून पाहून शिक्षण द्यावेत ज्यामुळे जेणेकरून विद्यार्थी स्पर्धेचा सामना करू शकतील असे प्रतिपादन माननीय आमदार बबनरावजी लोणीकर यांनी शहरातील देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूल येथे माननीय आमदार बबनराव लोणीकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय विज्ञान दिवस व मराठी भाषा गौरव दिन निमित्त आयोजित अपूर्व विज्ञान मेळावा, सांस्कृतिक कार्यक्रमाप्रसंगी केले. 
   यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष माननीय श्री. दिनकरराव चव्हाण तर प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. शरद बोराडे, प्रा. यशवंत दुबाले, देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूलचे संचालक सुबोध चव्हाण, डॉ. भाग्यश्री चव्हाण, प्राचार्य भागवतराव नाईकनवरे, नगरसेवक संदीप बाहेकर, प्रकाश चव्हाण, सुधाकर बापू सातोणकर ,कृष्णा अरगडे ,गणेशराव पवार, शत्रुघ्न कणसे, प्राचार्य गजानन कास्तोडे आदी उपस्थित होते. सदरील कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध विषयावर प्रयोगाचे आत्मविश्वासपूर्वक सादरीकरण केले तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात मराठी गीतांवर बहारदार नृत्य करून व विविध संतांच्या भूमिकेचे सादरीकरण करून उपस्थित सर्व प्रेक्षकांना खेळवून ठेवले. प्रेक्षकांनी मनमुरादपणे सदरील कार्यक्रमाचा आनंद लुटला व या चिमुकल्याच्या कलागुणाचे कौतुक केले.
 सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य गजानन कास्तोडे तर सूत्रसंचालन नयना जईद, राखी मुंदडा तर आभार प्रदर्शन अरुणा दीक्षित यांनी केले. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वंदना ककरिय, मनीषा लाळे, चंद्रकांत कपाळे, मनीषा लहाने, पूजा पावले, नूतन नलावडे, साक्षी झरेकर, प्रदीप चव्हाण, राजेश कार्लेकर, प्रदीप साळवे, बाळासाहेब कदम यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत