उद्धव ठाकरे च्या त्या विधानाचा तीव्र निषेध आमदार बबनराव लोणीकर, बोलताना भान ठेवून बोला नसता तुमचं महाराष्ट्रात फिरणं मुश्किल करू - आमदार लोणीकर,उद्धव ठाकरे यांनी खुराड्यात बसून घर कोंबड्यासारखं फेसबुक वर राज्य चालवलं हे महाराष्ट्राचे दुर्दैव - आमदार लोणीकरजालना प्रतिनिधी समाधान खरात 
कोरोना सारख्या भीषण संकट काळात राज्यातील जनता मरत असताना.. भीषण अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी, शेतकऱ्यांची पीक, शेतकऱ्यांची ढोर गुर वाहून जात असताना उद्धव ठाकरे घरात बसून घरकोंबड्या प्रमाणे राज्य फेसबुक वर चालवत होते. स्वतःच्या आमदार खासदार मंत्र्यांनाही भेटी देत नव्हते. उद्धव ठाकरे च्या अशा वागण्यामुळे पक्ष गेला चिन्ह गेले आमदार खासदार ही गेले खाली बाकी काहीच राहील नाही. 
   आता तरी राजकारणातील तज्ञ नेतृत्व, चानाक्ष नेतृत्व, अभ्यासू नेतृत्व, लोकप्रिय नेतृत्व मा. देवेंद्र जी फडणवीस साहेबांवर टीका करताना तारतम्य बाळगा नसता आम्हाला ही जशास तसे उत्तर देता येईल. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानाचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आता परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे केले.
 पुढे बोलताना आमदार बबनराव लोणीकर यांनी उद्धव ठाकरे यांचा खरपूस समाचार घेताना म्हणाले की देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी अमितजी शहा देवेंद्रजी फडणवीस जेपी नड्डा चंद्रशेखर बावनकुळे सुधीर भाऊ मुनगंटीवार आमच्या या नेत्यांवर टीका करताना भान ठेवून बोला नसता तुमचं महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य तुम्हाला या महाराष्ट्रात फिरू देणार नाही. तुम्ही पुन्हा वारंवार अशीच टीका करत राहिल्यास महाराष्ट्रातील जनता तुमचं थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही.

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.