आपण ठेवलेल्या विश्वासला तडा जाऊ दिला जाणार नाही- शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल,मोहन अग्रवाल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

 परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण

आपण ठेवलेल्या विश्वासाला कधीही तडा कधीही तडा दिला जाणार नाही व विविध विकास कामाच्या माध्यमातून आपला विभाग वआपले शहर सुंदर स्वच्छ करणार तसेच विविध नागरी सुविधा महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून सोडविण्याचे प्रयत्न करीत असून करोडो रुपयाचा निधी परतूर शहरासाठी मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातुन शासनाच्या विविध कल्याणकारी योजनाही आपल्या दारी पोहोचवण्याचे काम शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून करणार व माझ्या शेवटच्या श्वासा पर्यंत सामान्य नागरीकांचे प्रश्न सोडविणारअसे शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांनी परतुर शहरातील महाराणा प्रताप नगर जुना पोस्ट ऑफिस रोड येथे असंख्य कार्यकर्त्याच्या शिवसेना प्रवेश सोहळा प्रसंगी सांगितले.
शहरातील महाराणा प्रताप नगर येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोठ्या संख्येने युवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला, यामध्ये राजू ताजी, प्रताप काबरे ,यश महेर ,गणेश ताजी ,शंकर काबरे, युवराज ताजी ,कृष्णा ताजी, मुकुंद काबरे, सागर कांबरे, ओम राजू भारस्कर, राजू ताजी, भागवत गायकवाड, मयूर साबरे, विक्रम काबरे ,अर्जुन काकडे, अनिल सोनवणे, सचिन ताजी, संतोष दहीगज, सागर राजपूत, शिवा ताटू, आकाश चुंगडे, तेजपाल राजपूत व आदी युवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अमोल सुरुंग, शहर प्रमुख दीपक हिवाळे, युवा सेना तालुकाप्रमुख अविनाश कापसे, महिला आघाडी शहर प्रमुख संगीताताई मगर ,तेजस अग्रवाल, प्रणय मोर, वैद्यकीय कक्षाचे विधानसभा प्रमुख कैलाश चव्हाण, उपशहर प्रमुख कैलास पुरी, महिला आघाडी उपशहर प्रमुख सोनाली मगर, मधुकर निलेवाड ,विकास यादव व अशोक टेकाळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सुञसंचालन शहर प्रमुख दीपक हिवाळे यांनी केले तर आभार राजू ताजी यांनी मानले.

Popular posts from this blog

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात