समाजात सध्यां भोदूं संताची सख्या खूप वाढली आहे ह.भ.प. कवीराज महाराज झावरे

तळणी प्रतिनिधि रवी पाटील 
   हे मस्तक पायावर आहे पण ते कोणत्या संतांच्या पायावर आहे तर ते वारकरी संतांच्या पायावर आहे वर्तमानामध्ये संत नावाच्या उपाधीवर खूप टीका आहे कारण समाजात सध्यां भोदूं संताची सख्या खूप वाढली आहे या भोदूं संतांच्या पायावर डोके ठेवायचे का? तर ते नाही मग ते फक्त वारकरी सप्रदायाच्या विचारावार आणि वारकरी आचारावर जो नथमस्तक होतो अशा संतांच्या डोक्यावरच ठेवून आपल्या जीवनाचा उध्दार करून घ्यायचा असे प्रतिपादन ह भ प कविराज महाराज झावरे यानी तळणी येथे केले श्री संत सेवा मडळ व तळणी ग्रामस्थाच्या वतीने सुरू असलेल्या या सप्ताह निमीत्य सुरू असलेल्या या किर्तन महोत्सवात त्यानी दुसर्या दिवशीचे किर्तन पूष्प गुंफले


श्री संत तुकाराम म्हणतातमहाराज किमंत नाही आणि ऐकणार्याला ही किमंत नाही कारण स्मशानातले कोणी ऐकत नाही फक्त जगाच्या पाठीवर असे एकमेव व्यासपीठ आहे जेथे बोलणार्याला ही किमत आहे त्यापेक्षा एकणार्याला त्या पेक्षा ही किमंत ते व्यासपीठ म्हणजे वारकरी सप्रदांयाचे व्यासपीठ त्या व्यासपीठावर प्रत्यक्षात पांडूरग परमात्माचा सहवास असतो त्या व्यासपीठावरून धर्माच्या उन्नतीचे विचार माडल्या जातात तेथे फक्त भक्तीचा जागर असतो आदरचा स्नेह असतो प्रेमाचा ओलावा असतो आणि भावनेचा आदर असतो ते व्यासपीठ म्हणजे किर्तनाचे समाजाच्या प्रत्येकाचे असते अशा व्यासपीठात तुम्ही आम्ही खेळी मेळी ने सहवासीत होणे गरजेचे आहे किर्तनाच्या व्यासपीठावर ज्याच्या सदर्भाने बोलायचे त्या देवाचे अस्तीत्व तेथेच असते तरूणाच्या माध्यमातून इतर शो ठेवण्या पेक्षा किर्तनाचे आयोजन करणे . म्हणज खरोखर त्याच्या नावाची भक्ती होय 
महाराजांनी या अभंगातुन माता पिता ना आवडे अस म्हंटल आहे हिरण्यकश्यपूसारखा पिता आणि कैकई सारखी माता आम्हाला आवडत नाही कारण त्या दिसणारी द्वेश वृत्ती कोणासाठीच चांगली नाही धन का नको तर तेथे अंहकांर निर्माण होतो आणि तोच अहकांर भक्ती साधना करण्यापासुन विभक्त करतो पर्यायाने म्हणुन धन सुध्दा नको पाहीजे फक्त त्याच्या भक्तीचा लळा जो की संसारीक मनुष्याच्या जिवनाच्या उध्दाराचे साधन होय हे साधन प्राप्त करायचे असेल तर ज्ञानोबा तुकोबानी दाखवून दिलेला भक्ती मार्ग स्वीकारा तरच तुमचा उध्दार होईल

आज काल सप्ताह माध्यमातुन विविध प्रकारचे अधार्मीक कार्यक्रमाचे आयोजन काही केल्या जाते ते चुकीचे आहे आधीच तरुण पिढीचा कल देव देव करण्याकरिता कमी असतो आणि त्यात पून्हा अशा असस्कृत कार्यक्रमानी त्यात भर पडते आपल्या संतांनी आपल्या साठी आपल्या उध्दाराची खूप मोठी शिदोरी आपल्या साठी दिली आहे त्या काळात डोळ्यासमोर व एक उद्दीष्ठ ठेवून पूढच्चा अनेक पिढ्यांना संत वाङ्ममय कामी येईल समाजाने संघटीत राहुन समाजाच्या समस्या सोडवाव्या आपापसातील वैर संपावे संघटीत राहून संकटांचा सामना करता यावा या उद्देशाने सप्ताह असावेत संतांच्या त्या उद्देशाची गरज आज पुन्हा समाजाला आहे त्या काळात उत्सव साजरे करणे म्हणजे मोठा सघर्ष असायचा तरी सुध्दा लोक श्रध्येने उत्सव साजरे करायचे आताच्या काळात उत्सव साजरे करायला पूर्ण स्वातत्र्य असले तरी .त्या स्वातत्र्यात सस्कांराचा अभाव दिसुन येतो सण उत्सवातूनच आपल्या संस्कृतीचे प्रदर्शन होत्त असते .सद्य स्थितीत मुलावर सस्कांर करण्याची गरज आहे ज्ञानोबा तुकोबाच्या या भूमीत आपले स्वःत अस्तीत्व कायम ठेवायचे असेल तर त्यानी दाखवलेला भक्ती मार्ग स्वीकारा तरच मनुष्य जन्माचा उद्धार होईल

श्री संत सेवा मंडळ व तळणी ग्रामस्थाचे वतीने सुरु असलेल्या या सप्ताहचे हे अठरावे वर्ष असुन शिवमहापूराण कथा व महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकांराची किर्तनाचे आयोजन येथे केले आहे

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत