लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

श्री समर्थ विद्यालयात मासिक पाळी आरोग्य व्यवस्थापन याविषयी जनजागृती


परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
 परतुर तालुक्यातील पाटोदा माव येथील श्री समर्थ माध्यमिक विद्यालयत किशोर वयीन मुलींसाठी मासिक पाळी व आरोग्य व्यवस्थापण या विषयी  श्रीमती अमृता ठाकुर परतुर तालुका समन्वयक आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट मुंबई यांनी उजास प्रकल्प अंतर्गत दिली.                        किशोर वयातील मुलींसाठी आरोग्य व शिक्षण या बद्दल जनजागृती होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.या दृष्टिकोनातून जालना जिल्ह्यामध्ये उजास काम करत आहे त्याचाच एक भाग म्हणून तालुका समन्वयक अमृता ठाकूर या आज आमच्या शाळेत भेट देऊन किशोरवयीन मुलींना मासिक पाळी आरोग्य व्यवस्थापन या विषयात मार्गदर्शन केले यात मासिक पाळी चक्र किशोर अवस्था, शारीरिक बदल मानसिक बदल आहार ,आरोग्य स्वच्छता ,व्यायाम व स्वच्छ मासिक पाळीतील साधनांचा वापर याविषयी मार्गदर्शन केले.
       यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुरेशराव पाटोदकर , सहशिक्षक पाराजी रोकडे, उद्धव खवल , विद्यानंद सातपुते, भास्कर कुलकर्णी, धनंजय जोशी,सी,एन.खवल , पांडुरंग डवरे,शंकर खरात , गणेश वखरे आदींची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत