सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

शेतकऱ्याच्या खात्यात शासनाने दिलेल्या अनुदानाची रक्कम बाबतीत शेतकऱ्यांनी विचारना केली असता जालना शहरातील इंडियन बँकेच्या व्यवस्थापकाने शेतकऱ्याला शिवीगाळ केली-वीजय लहाने


 

जालना प्रतीनिधी नरेश अन्ना
  जालना जिल्ह्य़ात पावसाअभावी नैसर्गिक आपत्तीमुळे पेरणी केलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक कर्जात बुडाला असून, राज्य शासनाकडून मिळणाऱ्या मदतीच्या रकमेच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत राज्य सरकारकडून देण्यात येणार अनुदानाची रक्कम  बँकेच्या व्यवस्थापकाशी बँकेच्या खात्यात जमा झालेल्या रकमेबाबत विचारणा केली असता, बँकेच्या व्यवस्थापकाने शेतकऱ्याला शिवीगाळ केली, त्यामुळे शेतकऱ्याने  वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष  विजय लहाने यांच्या कडे  तक्रार केली  बँक व्यवस्थापकाने केलेल्या अर्वाच्य भाषेबद्दल बोलताना शेतकऱ्याने मदत मागितली, युवक जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी बँकेत येऊन बँक व्यवस्थापकाला त्यांच्या ग्राहकांची सेवा करण्याच्या कर्तव्याची आठवण करून दिली. 
   त्यांना सांगितले के आधीची शेतकरी कर्जाच्या बाजारात बुडालेलाअसून शेतकरी वर्ग हताश झालेला है आहे आश्या वेळेस  आपण त्यांना योग्य मर्गदर्शन करावे ना की आर्वाच भाषेत किंवा शिव गाळी करू नये आशी समज दिली

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत