निम्न दुधना जलाशयात कार्यक्षेत्राबाहेरील मच्छिमारांकडून अनाधिकृतपणे चोरुन मासेमारी
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण निम्न दुधना जलाशयात कार्यक्षेत्राबाहेरील मच्छिमारांकडून अनाधिकृतपणे चोरुन मासेमारी करत असल्याचे मापेगाव मच्छीमार सहकारी संस्था मर्या. मापेगाव या संस्थेच्या वतीने सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय जालना यांना सदर संस्थेच्या कार्यक्षेत्राबाहेरील मच्छीमार निम्नदुधना जलाशयात चोरुन व अनाधिकृतपणे कोळंबी, मासेमारी करत असल्याबाबतची तक्रार दिली होती. त्याअनुषंगाने सहाय्यक मत्स्य आयुक्त जालना यांनी पोलीस अधीक्षक जालना यांना पत्र पाठव या प्रजनन काळात अनधिकृत मासेमारी करण्याऱ्यावर कारवाई करण्याचे म्हंटले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, मापेगाव मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्या. मापेगाव या संस्थेकडे शासन निर्णय दि.०३.०७.२०१९ नुसार निम्नदुधना जलाशय मापेगाव मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्या. मापेगाव या संस्थेस तलाव ठेका आदेश जा. क्र. मत्स्य/भू ०११२०७/११२/३०१/२०२४, दि.३०.०७.२०२४ नुसार ०५ वर्षांच्या दीर्घ मुदतीच्या कालावधीसाठी मत्स्यव्यवसायाकरीता ठेक्याने दिला आहे. संस्थेने शासन धोरणानुसार सन २०२५ - २६ या कालावधीचा तलाव ठेका रक्कम व मत्स्यब...