Posts

न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरु पौर्णिमेच्या कार्यक्रम संपन्न

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा  न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज परतुर मध्ये गुरुपौर्णिमा निमित्त "जीवनातील गुरुचे महत्व" या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतला तसेच इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा या मंत्रावर शास्त्रीय पद्धतीने नृत्य सादर करून गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली.  नृत्य दरम्यान इयत्ता दहावीची विद्यार्थिनी संस्कृती संतोष झरेकर हिने जीवनातील गुरुचे महत्व सांगून शाळेतील सर्व शिक्षक वृंदाचे आभार मानले. या कार्यक्रमा दरम्यान संस्थेचे अध्यक्ष  नारायण  सोळंके ,संस्थेच्या सचिव छाया बागल तसेच व्हॉइस प्रिन्सिपल पूजा मोरे, शिक्षकवृंद व  शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

परतूर येथे स् आनंद शाळेत टुडंट्स लीड कॉन्फरन्स उत्साहात संपन्न.

Image
परतूर प्रतिनीधी कैलाश चव्हाण आनंद इंग्लिश स्कूल परतूर येथे पॉवर बाय लीड च्या मार्गदर्शनाखाली स्टुडंट्स लीड कॉन्फरन्स घेन्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन संजिवनीताई खालापुरे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमच्या अध्यक्ष डॉ लता पुरी तर प्रमुख अतिथी म्हणून  डॉ.मनिषा कदम, प्रमुख पाहुणे सौ शोभा कदम , श्रीमती सत्यशीला तौर   होत्या. विद्यार्थ्यांनी रोबोट ,अन्नसाखळी, सोलार सिस्टिम, रेन वॉटर हार्वेस्टिंग, हृदयाची कार्यप्रणाली, सेव्ह अर्थ, पवनचक्की ,प्रकाश संश्लेषण क्रिया ,उष्णता मापक यंत्र ,एटीएम मशीन, चुंबकाचे परिणाम, सॅटॅलाइट कार्यप्रणाली, किडनी इत्यादी प्रयोगाचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांना विविध प्रोजेक्ट तयार करण्यासाठी सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले. यासाठी पालकांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रयोगाचे मोठ्या आत्मविश्वासाने सादरीकरण केले. परतुर शहरामधील कृतीतुन व प्रयोगातुन शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे आनंद इंग्लीश शाळा असे मत अनेक पालकांनी मांडले यावेळी.  पालक व परतुर शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन विद्यार्थ्यां...

महावितरण परतूर येथे लाईनमन दिवस उत्साहात साजरा.

Image
परतूर प्रतिनीधी कैलाश चव्हाण  येथील महावितरण कंपनी मध्ये लाईनमन दिवस साजरा करण्यात आला.उन वारा पावसाची तमा न बाळगता परिस्तिथी कोणतीही असो प्रामाणिक पणे वीज ग्रहकाना सेवा देणाऱ्या लाईनमन चा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता .    लाईनमन मंजे प्रकाश दुत असून वीज वितरण कंपनीचे मुख्य घटक आहेत.वीज ग्रहकानी लाईनमन ला सन्मानाची वागणूक द्याला पाहिजे. अन्न,वस्त्र,निवारा या ही पेक्षा वीज महत्वाची झाली आहे त्या मुळे वीज सेवा पुरवणाऱ्या लाईनमन चे समाजाने आभार मानले पाहिजे असे गोरव उदगार परतूर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा वीज वितरण सलागर समितीचे मा. अध्यश भगवानराव मोरे हे प्रमुख पाहुणे मनून बोलत होते.   या कार्यक्रमास वीज वितरण परतुरचे प्र. उपकार्यकारी अभियंता पी. एस. गणेर, सह्याक अभियंते मंगेश रामटेके, एन. टी.केंद्रे,महेश मोरखडे कर्मचारी शाम पाठक,रमेश आढाव, लाईनमन जी. ए.चेंदेल,रामदास वायल,रवींद्र वणवे, रामेश्वर भामट , हनुमान काळे, विठल आघाव, विलास खरात, सचिन जैद, नदीम शेख, राम पवार , निळू सोळंके,प्रकाश ताठे, रंगनाथ भुंबर, दाता कष्टे, पंचफुला कोटणक, आदी ...

आष्टी’च्या सहायक पोलिस निरीक्षकांच्या चौकशीसाठी विशेष अधिकारी- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
प्रतिनीधी कैलाश चव्हाण मुंबई-आष्टी पोलिस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षकांनी अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी अधिकारी नेमण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.             कोकाटे हादगाव ता.परतूर, जि. जालना जिल्ह्यातील शेतीच्या वादातून गावातील दोन समुदायांमध्ये वाद झाला. काही लोकांच्या घरावर हल्ला करण्यात आल्याने जखमी झाल्याची तक्रार देण्यासाठी तक्रारदार आष्टी पोलिस चौकीला गेले असता त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून आष्टी चे पोलीस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षकांनी अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत विधान परिषदेचे सदस्य गोपीचंद पडळकर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, पोलिसांनी जात, धर्म या पलीकडे जावून काम करावे. या प्रकरणात मारहाणीची ध्वनिचित्रफितीची 15 दिवसांत पडताळणी केली जाईल. जालना पोलिस ठाण्याकडून हे प्रकरण काढून सीआयडीकडे देण्यात येईल. त्यासाठी विशेष ...

नवीन वाद निर्माण होण्या पूर्वीच;प्रशासनाने उढ्ढाण पुलावरी झेंड काढले

Image
परतूर प्रतिनीधी कैलाश चव्हाण परतूर तालुक्यातील आष्टी वलखेड घनसांवगी तालुक्यातील पारडगांव कंडारी आसे अनेक गांवाना नेहमीच रेल्वेगेट चा त्रास होत होता मतदार संघाला लोणीकर यांच्या माध्यमातून मंत्री पद मिळाले आणि या रेल्वे गेटवर लोणीकर यांनी उढाण पूला करीता प्रयन्त केले आणि उढाण पूल तयार झाला व नुकतेच आ.बबनराव लोणीकर याच्या हस्ते लोकार्पन सोहळा झाला व उढाण पूला वरून रहदारी सुरु झाली उढाण पूल याला वेगवेगळ्या महामनावाची नावे देण्याकरीता वीवीध निवेदन देण्यात आले हे इतक्या वरच न थांबता या पुलावर विविध रंगाचे झेंडे लावल्याने प्रशासनासमोर नवीनच प्रश्न निर्माण झाला होता. हया झेंड्या मुळे  भवीष्यात नवीनच वाद निर्माण होऊ नये म्हणून शेवटी नगरपालिका ,पोलीस,महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली व झेंडे हटवून पोलिसात गुन्हा दाखल झाला.  या पुलावर वाहतूक सुरू झाल्याचा आनंद वाहनचालक घेत असतांनाच पुलावर विविध रंगाचे झेंडे ऐन रस्त्याच्या मध्यभागी रात्रीतून कोणतीही परवानगी न घेता लावण्याचे काम झाल्याने पुलावर या झेंड्याचा अडथळा निर्मा...

शिक्षकानी काळानुसार बदल करावा-कपील अकात

Image
परतूर – प्रतिनिधी कैलाश चव्हाण  मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ शिक्षण संस्थेत काम करणारे सर्व कर्मचारी हे आकात कुटुंब आहे. प्रत्येक कर्मचारी हा आकात कुटुंबातील सदस्य आहे. शिक्षकांनी संस्थेत अध्यापण  करीत असतांना काळानुसार बदल करावा असे आवाहन संस्थेचे सचिव कपिल आकात यांनी केले. ते येथील लाल बहादुर शास्त्री विद्यालयात मुख्याध्यापक वसंत सवने यांच्या सेवागौरव कार्यक्रमात बोलत होते. ... मुख्याध्यापक वसंत सवने यांना सेवानिवृत्त कार्यक्रमात सेवागौरव करतांना संस्थेचे सचिव कपिल आकात अध्यक्षा आशाताई आकात, माजी जी.प सदस्य अमृतराव सवने, जी.प.सदस्य शिवाजी सवने, आदि  यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आशाताई आकात, माजी जी.प सदस्य अमृतराव सवने, जी.प.सदस्य शिवाजी सवने, हनुमंत काटमोडे, सुधाकर सवने, दैठना खू. सरपंच सुनील तायडे, येनोरा सरपंच उद्धव जोगदंड, संतोष डव्हारे, उतमराव खरात, सुभाषराव सवने, अरुण बाहेती, पंडित भूबर, दैठना खू. उपसरपंच राजेश काटकर, यशवंत दुबाले, शरद पाटील, यांची उपस्थिती होती. यावेळी प...

भवितव्य घडविणाऱ्या शिक्षणाची गरज- मा.आ बबनराव लोणीकर

Image
परतुर - कैलाश चव्हाण     मुलाचे भविष्य घडविण्यासाठी आज चांगल्या शिक्षणाची गरज आहे. पालकांनी मुलाच्या दर्जेदार शिक्षणासाठी आग्रही राहिले पाहिजे. आजच्या युगात पुस्तके ज्ञानासोबतच विज्ञानाकडे सर्वांगीण दृष्टिकोनातून पाहून शिक्षण द्यावेत ज्यामुळे जेणेकरून विद्यार्थी स्पर्धेचा सामना करू शकतील असे प्रतिपादन माननीय आमदार बबनरावजी लोणीकर यांनी शहरातील देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूल येथे माननीय आमदार बबनराव लोणीकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय विज्ञान दिवस व मराठी भाषा गौरव दिन निमित्त आयोजित अपूर्व विज्ञान मेळावा, सांस्कृतिक कार्यक्रमाप्रसंगी केले.     यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष माननीय श्री. दिनकरराव चव्हाण तर प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. शरद बोराडे, प्रा. यशवंत दुबाले, देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूलचे संचालक सुबोध चव्हाण, डॉ. भाग्यश्री चव्हाण, प्राचार्य भागवतराव नाईकनवरे, नगरसेवक संदीप बाहेकर, प्रकाश चव्हाण, सुधाकर बापू सातोणकर ,कृष्णा अरगडे ,गणेशराव पवार, शत्रुघ्न कणसे, प्र...

माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवून साजरा,परतूर येथे रंगला कुस्त्यांचा फड तर वाटूर येथे हॉलीबॉल स्पर्धा, परतुर या ठिकाणी नेत्र तपासणी शिबिर

Image
प्रतिनिधी कैलाश चव्हाण आपले संपूर्ण आयुष्य समाजाच्या सेवेसाठी असून समाजाचे ऋण मी कदापि विसरणार नाही, सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादानेच मी थेट सरपंच पदापासून तर मंत्रिपदापर्यंत पोहोचू शकलो, असे भाऊ उद्गार माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी काढले    ते जिल्हाभरात विविध ठिकाणी वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांच्या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना बोलत होते    पुढे बोलताना ते म्हणाले की माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये मी माझा वाढदिवस स्वतःहून कधी साजरा केला नाही जनसामान्यांच्या मनात आपण आपले स्थान निर्माण केल्यामुळे माझ्यावर प्रत्येक स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला त्याबद्दल सर्वांना त्यांनी धन्यवाद दिले     पुढे बोलताना ते म्हणाले की मी लोणी गावच्या सरपंचापासून सुरू केलेला प्रवास थेट मंत्रीपदापर्यंत झाला मात्र यात सर्वसामान्य जनतेचा सिंहाचा वाटा असून या सर्वसामान्य जनतेमुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलो असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले      पुढे बोलताना ते म्हणाले की मी ज...