Posts

Showing posts from April, 2021

आनंद डेलिकेटेड कोरोना हेल्थ सेंटरचे उदघाटन येत्या रवीवारी ना.राजेश टोपे यांच्या हस्ते

परतूर(प्रतीनीधी) परतूर शहर व ग्रामीण भागातील कोरोनाग्रस्त रुग्णांची गरच लक्षात घेता शिवछत्रपती शिक्षण व क्रीडा मंडळाच्या सहभागातून आनंद शाळेच्या इमारतीत 'आनंद डेडिकेटेड कोरोना हेल्थ सेंटर ' सुरू होत आहे . याचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जालना जिल्हयाचे पालकमंत्री मा. राजेश भैया टोपे साहेब यांच्या हस्ते दि. 02 मे 2021  रविवार रोजी सकाळी 10 वा होत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे वक्ता प्रशिक्षण विभागाचे प्रदेश अध्यक्ष मा.प्रदीपदादा सोळंके उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा.आ.सुरेशकुमार जेथलिया , मा. राहुल लोणीकर , मा.कपिल आकात, मा. अशोक आघाव  उपस्थित राहणार आहेत. या रुग्णालयासाठी डॉ.प्रमोद आकात, डॉ.भानुदास कदम , डॉ.मुनीर कादरी, डॉ.गजानन केशरखाने , डॉ. कुणाल उढाण , डॉ.शरद पालवे रुग्ण सेवा देणार आहेत.            या रुग्णालयात सुरुवातीला 24 ऑक्सिजन व 21नॉन ऑक्सिजन बेड राहणार आहेत. रुग्णांच्या गरजेनुसार यात वाढ केली जाईल. तरी या रुग्णालयाचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवछत्रपती शिक्षण व क्रीडा मंडळाचे

भारतीय जनता पार्टी चे नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष संदीपजी बाहेकर यांची कोविड रुग्णाच्या कुटुंबियांना मदत,माजी मंत्री बबनराव लोणीकर व युमो महामंत्री राहुल लोणीकर यांच्या सूचनेवरून राबवला उपक्रम

परतूर येथे कोविड सेंटर मध्ये ऍडमिट रुग्णांच्या नातेवाईकांना मदत व्हावी या उद्देशाने भाजपा चे नगरसेवक तथा माजी उपनगराध्य संदीपजी बाहेकर यांनी माजी मंत्री बबनराव लोणीकर व युमो महामंत्री राहुल लोणीकर यांच्या सूचनेवरून परतूर कोविड सेंटर येथे ऍडमिट असलेल्या रुग्णाच्या कुटुंबियांची जेवणाची व्यवस्था करून, सामाजिक उत्तरदायित्व निभावण्यासाठी पुढाकार घेतला असून परतूर येथे रोज सकाळ संध्याकाळ कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना डब्बा पुरवण्याचे काम ते करत आहेत.  या संदर्भात संदीप बाहेकर म्हणाले की या कठीण प्रसंगी हॉटेल बंद असून रुग्णांच्या नातेवाईकांना जेवण उपलब्ध होत नाही हा विचार करून माजी मंत्री बबनराव लोणीकर व युमो प्रदेश सरचिटणीस राहुल भैय्या लोणीकर यांच्या सूचनेवरून आपण ही सेवा करीत असल्याचे सांगितले   पुढे संदीप बाहेकर म्हणाले की, आज कठीण परिस्थिती असून,या काळात आपण खंबीरपणे उभे राहून जनतेला धीर देण्याची गरज असून या साठी आपण हा उपक्रम राबवत असल्याचे ते म्हणाले

परतूर येथे संजीवनी कोविड रुग्णालयाचे उद्घाटन,युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या हस्ते झाले उद्घाटन,सातोनकर हॉस्पिटल व युवा मोर्चाने घेतला पुढाकार

Image
परतुर (प्रतिनिधी ) संजीवनी हॉस्पिटल चे संचालक डॉक्टर प्रदीप सातोनकर व भाजयुमो च्या वतीने परतूर येथे संजीवनी डी सि एच सी कोविड रुग्णालयाचे उद्घाटन भाजयुमोचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी  भाजपाचे जेष्ठ नगरसेवक सुधाकरराव सातोनकर, डॉक्टर प्रदीप सातोनकर, डॉक्टर गायकवाड वैद्यकीय अधिकारी डॉक्टर डी आर नवल, युवा मोर्चा सरचिटणीस संपत टकले ,भाजयुमो तालुकाध्यक्ष शत्रुघन कणसे नगरसेवक प्रकाशराव चव्हाण, नगरसेवक कृष्णा आरगडे ,नगरसेवक जगन बागल ,युवा मोर्चा तालुका सरचिटणीस रवी सोळंके राजेंद्र मुंदडा माऊली सोळंके, श्याम सुंदर चितोडा, प्रशांत बोनगे ,किशोर कद्रे यांच्यासह संचालक  प्रवीण सातोनकर यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना राहुल लोणीकर म्हणाले की राज्यभरामध्ये कोरोना ची भयावह स्थिती असून अशा स्थितीमध्ये शहरातील सर्वच रुग्णालयांच्या खाटा भरलेल्या आहेत  यामुळे अनेक रुग्णांना उपचाराअभावी प्राण गमवावे लागत आहेत मात्र ग्रामीण भागातील रुग्णांच्या समस्या लक्षात घेऊन सातोनकर हॉस्पिटल व युवा मोर्चाने पुढाकार घेत परतूर येथे कोविड सेंटर सुरू केल्याने बऱ्याच रुग्णांन

सातोनकर हॉस्पिटल व भाजयुमो च्या वतीने परतूर येथे कोविड हॉस्पिटल,माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते होणार उदघाटन

परतूर (प्रतिनधी) डॉ प्रदीप सतोनकर व भारतिय जनता युवा मोर्चा च्या वतीने कोरोना चा वाढता प्रभाव लक्षात घेऊन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस,माजी मंत्री बबनराव लोणीकर,युवा मोर्चा प्रदेशध्यक्ष विक्रांत पाटील युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल भैय्या लोणीकर यांच्या सूचनेवरून  भाजपा नगरसेवक सुधाकर सतोनकर यांचे चिरंजीव डॉ प्रदीप सातोनकर(M.B.B.S.,DCH) व प्रवीण सातोनकर यांच्या सह डॉ.बाबासाहेब गायकवाड (M.B.B.S.DCH,DNB) दिल्ली,हे परतूर येथे 30 बेड असलेले कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रवीण सातोनकर यांनी दिली आहे. सदरील संजीवनी कोविड सेन्टर चे उद्घाटन माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते दिनांक 28 रोजी करण्यात येणार असून या वेळी भाजयुमो प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे      युमो प्रदेशमहामंत्री राहुल लोणीकर यांनी परतूर शहरात हॉस्पिटल सुरू व्हावे या करिता डॉ प्रदीप सातोनकर यांच्याशी चर्चा करून हॉस्पिटल सुरू करण्या संदर्भात निंर्णय घेण्यात आला   या हॉस्पिटलमध्ये 14 ऑक्सिजन बेड, 16 आयसुलेशन बेड उपलब्ध राहणार असून ग्रामीण भागातील वाढलेल्या कोरोना

मनसेच्या प्रयत्नाला यश, संजीवनी हॉस्पिटलची होणार चौकशी

Image
जालना शहरातील संजीवनी हॉस्पिटलमध्ये काळा बाजार व गोर गरीब रुग्णांची आर्थिक लुट व तसेच रुग्णांना चांगले ऊपचार  मिळत नसल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेश्वर काकडे यांनी जालना जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केली आसता. जालना जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी यांचे स्विय्य सहाय्यक खेडेकर यांनी पत्र काढुन येत्या दोन ते तीन दिवसामध्ये जालना येथील संजीवनी हॉस्पिटलची चौकशी करुन हाॅस्पीटलचा कारभार व हाॅस्पीटलचा रेकॉर्ड मनसेचे सिद्धेश्वर काकडे यांना देणार आहेत. तसेच जालना जिल्ह्यातील ज्या रुग्ण नातेवाईक यांना ईतर ठिकाणी हाॅस्पीटल व ईतर समस्यांचा सामना करावा लागत आसेल तर आपल्याशी संपर्क साधावा कोरोना  काळामध्ये वाढणारे हॉस्पिटलचे बिल व मदत केली जाईल आसी माहीती काकडे यांनी दिली आहे.

22 एप्रिल रात्री ८ वाजेपासुन 1 मेपर्यंत राज्यात कडक लाँकडाऊन,अत्यावश्यक सेवा व्यतरीक्त जील्हा बंदी घोषित तर लग्न संभारंभास केवळ दोन तासच .

       ( वृतसेवा )    नवे निर्बंध -खालीलप्रमाणे राज्य सरकार, केंद्र सरकार आणि स्थानिक प्रशासनाशी संबंधित सर्व सरकारी कार्यालये फक्त १५ टक्के कर्मचारी क्षमतेने कार्यरत राहतील. कोरोनाशी संबंधित अत्यावश्यक सेवांच्या कार्यालयांना यातून वगळण्यात आले आहे.अत्यावश्यक सेवेत नसलेले मात्र १३ एप्रिल रोजी जाहीर झालेल्या आदेशांमध्ये अपवाद म्हणून वगळण्यात आलेल्या कार्यालयांना १५ टक्के किंवा ५ कर्मचारी यापैकी जी संख्या जास्त असेल, त्या क्षमतेने कार्यरत राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. प्रत्यक्ष लोकांपर्यंत अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आवश्यकतेनुसार १०० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची परवानगी असेल.लग्नसमारंभ फक्त एकाच हॉलमध्ये २ तासांमध्येच पूर्ण करावे लागतील. यासाठी एकूण २५ लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी असेल. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कुटुंबाला ५० हजार रुपये दंड तर हॉलवर कोरोनाची परिस्थिती सामान्य होईपर्यंत बंदी घालण्यात येईल. *बसेस सोडून सर्व खासगी प्रवासी वाहतूक पर्यायांना फक्त अत्यावश्यक कारणासाठीच प्रवासी वाहतूक करता येईल. त्यासाठी चालक आणि एकूण प्रवासी क्षमतेच्या ५० टक्के प्र

कोरोना काळात गलथान कारभाराचे अजून किती बळी सरकारला हवेत? नाशिक ऑक्सिजन गळतीवर माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचा सवाल,नाशिक ऑक्सिजन गळती प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा, महाराष्ट्रातील सर्व ऑक्सिजन उपलब्ध असणाऱ्या हॉस्पिटलची तात्काळ तज्ज्ञांच्या माध्यमातून तपासणी करा - लोणीकरांची मागणी*===================

Image
जालना(प्रतिनिधी ) नाशिकमध्ये आधीच ऑक्सिजनची कमालीची कमतरता असताना नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीच्या पाईप लाईनला बुधवारी (दि. २१ एप्रिल) बारा- साडेबारा वाजेच्या सुमारास गळती लागली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी या घटनेवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या रुग्णालयातील अनेक रुग्ण ऑक्सिजनवर व व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. या दुर्घटनेमुळे ऑक्सिजन गळतीमुळे २२ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली आणि मन अगदी सुन्न झालं आहे. कोरोना काळात गलथान कारभाराचे अजून किती बळी सरकारला अपेक्षित आहेत? असा सवाल करत या ऑक्सिजन गळती प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर नाशिक ऑक्सिजन गळती प्रकरणानंतर केली आहे. मागील २ महिन्यातील हि तब्बल ८ वी घटना असून कोरोना काळात सरकारच्या गलथान कारभारामुळे, बोगस किटचा वापर करणे त्यामुळे पॉझिटिव्ह नसताना कोरोना पॉझिटिव्ह येणे किंवा आजच्या घटनेप्रमाणे मृत्यूचा सामना करावा लागतो आहे. त्यातच तब्बल २ तास ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने पर

जालना येथील संजीवनी हॉस्पिटलची चौकशी करा,मनसे नेते सिध्देश्वर काकडे यांची मागणी

Image
मंठा(प्रतीनीधी) जालना येथीेल संजीवनी हॉस्पिटलने रुग्णसेवेच्या नावाखाली कोरोना सारख्या आजाराच्या मोठ्या संकटात बाजार मांडुन पैसे थाटण्याचा व्यावसाय ऊभारला आसल्याचा घणाघाती आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेश्वर काकडे यांनी केला आहे. या हाॅस्पीटलमध्ये रूग्ण नातेवाईकांच्या अनेक तक्रारी आपल्याला येत आसुन आव्वाच्या सव्वा बिल लाऊन सर्व सामाण्य लोकांना वेठीस धरण्याचे काम हे हाॅस्पीटल करत आसल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेश्वर काकडे यांनी जालना जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे. जालना येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये डाॅक्टरांचा मनमानी कारभार आसुन या हाॅस्पीटलमध्ये राजकीय व बड्या लोकांनाच चांगली सेवा देत आसुन याकडे जालना जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य प्रशासनाने तातडीने लक्ष घालुन संजीवनी हॉस्पिटलची चौकशी करावी आसी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील प्रत्येक  हाॅस्पीटलने व औषधी विक्रेते यांनी सर्व सामान्य लोकांसाठी रेमडेसविर व व्हेंटीलेटर व

प्रशासनाकडुनच कोरोनाला आमंत्रण मनसे नेते सिध्देश्वर काकडे यांचा आरोप

Image
दिनांक १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजल्या पासुन महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांनी संचारबंदी कलम १४४ नुसार लागु केली आहे. जालना जिल्ह्यात संचारबंदीचा फज्जा ऊडतांना दिसुन येत आहे. मग या संचारबंदीचा फायदा काय? आसा सवालच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेश्वर काकडे यांनी ऊपस्थीत केला आहे. मंठा तालुक्यातील तळणी, ऊस्वद,देवठाणा, वझर सरकटे, भुवन आदी पात्रातुन मनोसोक्त अवैध वाळू वाहतूक व लीलावधारक संचारबंदीमध्ये  वाळू वाहतूक करत आहेत. या पात्रामध्ये  वाळू भरतांना २०० मजुर जमतात. सोशल डिस्टींगचा फज्जा ऊडुवुन कोरोना या आजाराला आमंत्रण देत असल्याचा आरोप मनसेचे सिद्धेश्वर काकडे यांनी केला आहे. जालना जिल्हा अप्पर जिल्हाधिकारी यांच्या सोबत भ्रमनध्वनीद्वारे संपर्क साधला असता ते म्हणाले नियम बघुन कार्यवाही केली जाईल. तसेच  मंठा तालुक्यामध्ये वाळू वाहतूक करणारे टिप्पर व हायवा यांना कोणत्याही नंबर प्लेट नाहीत. या हायवा व टिप्पर मोठ्या प्रमाणावर रोडवर धावतात. या हायवा आणि टिप्परमुळे ईतर वाहुतकीस त्रास होतो आहे. याकडे आरटीओ आणि तसेच महसुल प्रशासनाचे ज

शासनाच्या सर्व नियमाचे पालन करून सम्राट अशोक मित्र मंडळ व ऑल इंडीया पॅथर सेनेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती यांचीं साजरी

Image
   परतूर(प्रतीनीधी) येथील तहसील कार्यालया समोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजीत पुतळ्याच्या जागेवर शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमाचा पालन करुन सम्राट अशोक मित्र मंडळ व ऑल इंडिया  पॅंथर सेना यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली               याप्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्याच्या जागी सर्वात अगोदर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले त्यानंतर बुद्ध वंदना घेऊन माजी समाज कल्याण सभापती शहाजी राक्षे, सम्राट  मित्र मंडळाचे अध्यक्ष संतोष हिवाळे, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष शामसुंदर चितोडा,ऑल इंडीया पॅथर सेनेचे ता.अध्यक्ष आर्या कांबळे,प्रवीण प्रधान,राहूल गणकवार,सुमित भंडारी,रवी मानकर,अर्जुन राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले        या कार्यक्रमात बुद्ध वंदना राहूल खंडागळे यांनि गायली कार्यक्रम यशस्वीते साठी सुनिल पाडेवार,सतीश हीवाळे,नरेंद्र कांबळे,सुनिल पाईकराव,पै.अकाश राक्षे,शुभम पाईकराव,ऋषिकेश नवघरे,चन्दर मस्के,वीठ्ठल कांबळे,दामू  आदीनी परीश्रम घेतले

सोनदेव येथे 258 नागरिकांनी घेतली कोरोनाची*लस.,ज्ञानेश्वर शेजुळ यांनी केला मोहीमेचा शुभारंभ,.नागरिकांनी मानले पंतप्रधान मोदीव आमदार लोणीकर यांचे आभार

Image
जालना  {प्रतिनिधी} गेल्या वर्षभरापासुन कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवला असल्याने जनता भयभीत झालेली आहे.अनेक महीण्यापासुन सर्वसामान्य शेतकरी ,शेतमजुर,छोटेमोठे व्यापारी लाॅकडाऊन असल्यामुळे सर्वच क्षेत्रातील जनता भयभीत व परेशान आहे.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांसाठी अनेक प्रकारची मदत केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनावर उपाय म्हणुन संपुर्ण देशातील नागरिकांसाठी मोफत लस उपलब्ध करुन दिली आहे. महाराष्ट्र राज्याचे मा.मंत्री तथा परतुर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री बबनराव लोणीकर यांच्या पुढाकाराने आज दि.10/04/2021 रोजी सेवली प्रा.आ.केंद्राअंतर्गत मौजे सोनदेव येथे 45 वर्षावरील नागरिकांसाठी मोफत लसिकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या लसिकरणाच्या कार्यक्रमाचा भा.ज.पा.चे जालना जिल्हाउपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर {माऊली} शेजुळ यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला.या कार्यक्रमात जवळपास 258  नागरिकांनी लसिकरणाचा लाभ घेतला आहे.सोनदेव येथे पहीले लसिकरण श्रीमती कुशीवर्ताबाई रावसाहेब खांडेभराड यांचे करण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस उपलब्ध करुन दिल्

डॉ.आंबेडकर जयंती कोरोना नियमांचे पालन करून साजरी करा ll सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार यांनी केले आवाहन ll

Image
परतूर,दि.८(प्रतिनिधी) -  भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती कोरोना नियमांचे पालन करत घरातच साजरी करावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार यांनी केले आहे.      भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती १४ एप्रिल रोजी साजरी करण्यात येणार आहे. परंतु सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना महामारीने थैमान घातले आहे.राज्यात कोरोनाचा वाढता प्रभाव व कोरोनामुळे मृत्युमुखी पडणारांची संख्या पाहता शासनाने काही नियम घालून दिले आहेत.अनुयायांनी शासनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.शासनाच्या निर्देशांचे पालन करावे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्व आंबेडकर अनुयायांनी रस्त्यावर गर्दी न करता आपआपल्या गावातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर व बौद्ध विहारात मोजक्याच उपासकाच्या उपस्थिती मध्ये दीपप्रज्वलन करून बौद्ध वंदना घ्यावी.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सर्व  बांधवानी आपल्या कुटुंबासमवेत  घरातच करावे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३० जयंती मोठ्या उत्साहात साजरी करावी. घरावर पंचशील व निळा ध्वज उ

अचानकपणे लॉकडाऊन सादृष्य निर्बध लादल्याने सर्वसामान्य कष्टकरी,छोटे व्यापारी अडचणीत,सर्वसामान्य जनतेचा उद्रेक होण्याची शक्यता,सर्वसामान्य जनतेची व्यवस्था करा,मगच कडक निर्बंध लादा -माजी मंत्री बबनराव लोणीकर

Image
परतूर(प्रतिनधी) सरकारने हप्त्यात  शनिवार रविवार असे दोन दिवस लॉक डाउन करण्याची घोषणा केली होती मात्र राज्यात इतर दिवशी लॉक डाउन सादृश्य कडक निर्बंध लादल्याने सर्वसामान्य जनता त्याचबरोबर हातावर पोट असलेले छोटे व्यवसायिक यांचा उद्रेक होण्याची शक्यता असून माननीय मुख्यमंत्री यांनी व सरकारने सर्वसामान्यांच्या गरजांची पूर्तता करून मग खडक निर्बंध लावावे असे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात ही मागणी केली असून पुढे या पत्रात म्हटले आहे की मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून सहकार्य करण्याचे आवाहन केले होते या अनुषंगाने राज्यामध्ये शुक्रवारी रात्रीपासून ते सोमवारी सकाळपर्यंत आता प्रत्येक हप्त्याच्या शेवटी लॉकडाउन डाऊन करण्यात येणार होता मात्र सरकारने कडक निर्बंधांचा नावाखाली  लॉक डाऊन सदस्य निर्बंध घातल्याने हातावर पोट असणाऱ्या ची पंचायत झाली असून छोटे व्यापारी मजूर कष्टकरी यांना उपजीविका चालवण्यासाठी पॅकेज उपलब्ध करून द्यावे व नंतरच लॉक

ब्रेक दि चेनच्या आदेशात पुन्हा नवीन सुधारणा,काही आवश्यक सेवांचा समावेश

मुंबई (वृतसेवा)  दि  ४ एप्रिल रोजी ब्रेक दि चेनच्या आदेशात ज्या आवश्यक सेवांचा उल्लेख होता, त्यात आणखी काही सेवांचा समावेश आज राज्य सरकारने केला आसून. त्या संदर्भातील आदेश  प्रसिद्ध करण्यात आले आहे.  आता खालील सेवा देखील आवश्यक सेवा ( Essential Services)  मध्ये समावीष्ट करण्यात आल्या आहेत १. पेट्रोल पंप, आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने  २. सर्व प्रकारच्या कार्गो सेवा  ३. डेटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर्स, आयटी - माहिती तंत्रज्ञान सबंधित महत्वाच्या पायाभूत सुविधा आणि सेवा   ४. शासकीय व खासगी सुरक्षा सेवा  ५. फळविक्रेते  खालील खासगी आस्थापना व कार्यालये सकाळी ७ ते रात्रो ८ या कालावधीत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र केंद्र शासनाच्या निर्देशानुसार त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे लागेल. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत दर १५ दिवसांचे कोरोना निगेटिव्ह आरटीपीसीआर प्रमाणपत्र बाळगावे लागेल. 10 एप्रिलपासून याची अंमलबजावणी केली जाईल आणि नियम तोडणार्या व्यक्तीकडून १ हजार रुपये दंड घेण्यात येईल. *ह्या खासगी आस्थापना व कार्यालये पुढीलप्रमाणे आहेत:* सेबी तसेच सेबी मान्यताप्राप्

भाजपा पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी पक्ष स्थापना दिवस आपापल्या घरावर भाजपाचा झेंडा लावून साजरा करावा- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर

 

आंबा येथे कोविड लसीकरण कॅम्प,युवामोर्चा ने घेतला पुढाकार,माजी मंत्री बबनराव लोणीकर,प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला पुढाकार

Image
परतूर(प्रतिनधी) आंबा ता परतूर येथे भा ज यु मो च्या वतीने माजी मंत्री बबनराव लोणीकर व प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंबा ग्रामपंचायत व युमो कार्यकर्ते प्रशांत बोनगे यांच्या पुढाकाराने कोविड लसीकरण कॅम्प संपन्न झाला.   आज महाराष्ट्र राज्यात कोविड चा प्रकोप मोठ्या प्रमाणावर असून लसीकरण करून घेणे गरजेचे आहे म्हणून माजी मंत्री बबनराव लोणीकर व युवा नेते राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी कॅम्प घेण्यात आला असून आज 121 जणांना कोविड ची लस देण्यात आली लसीकरण करून घेणे ही काळाची गरज असून या कामात राजकीय हेवे दावे विसरून प्रत्येक गावात असे कॅम्प करणे गरजेचे आहे त्या मुळे आंबा गावचा आदर्श घेऊन तालुक्यातील गावांनी लसीकरण मोहीम  राबवणे गरजेचे असल्याचे बोनगे यांनी म्हंटले आहे   या प्रसंगी सरपंच मेराज खतीब उपसरपंच महादेव वीर, दत्ता आढाव प्रशांत बोनगे रामा कोरडे कृष्णा भदर्गे डॉक्टर सचिन वायाळ श्री भाताने आडे आरोग्य सेवक श्रीमती खरात आरोग्यसेविका श्रीमती कपाळे आशा वर्कर श्रीमती काळदाते आशा वर्कर उद्धव बोनगे राजु कोरडे सुनील बोनगे राहुल भदर्गे विठ्ठल बोनग

भाजपा पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी पक्ष स्थापना दिवस आपापल्या घरावर भाजपाचा झेंडा लावून साजरा करावा- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर

Image
 परतूर प्रतिनिधी  दिनांक 6 एप्रिल  हा भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेचा दिवस कार्यकर्त्यांनी आप आपल्या घरावर भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावून स्थापना दिवस साजरा करावा असे आवाहन माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी केले आहे  माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,  भाजपा स्थापना दिवसाच्या शुभमुहूर्तावर आपण  कार्यकर्त्यांनी सर्व बुथ वर मोठ्या उत्साहाने विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून व  यानिमित्त मिठाई व फळ वाटप करून आनंद उत्सव साजरा करावा भारतीय जनता पार्टी हा जगातील सर्वात मोठा पक्ष असून या पक्षाची वैभवशाली परंपरा व गौरवशाली इतिहास या विषयावर चर्चासत्रे किंवा वर्च्युअल सभा आयोजित करून देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र जी मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने केलेली विविध विकास कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी असे आवाहन सदरील पत्रकात करण्यात आलेले आहे        हे कार्यक्रम करत असताना  कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करीत स्थापना दिवस  साजरा करावा असे या पत्रकात म्हटले आहे.      पक्षाचे सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी ब

जालना जिल्हा शिवसंग्रामची कार्यकारणी बरखास्त... तानाजीराव शिंदे प्रदेश अध्यक्ष,जिह्यातील जेष्ठ नेते व कार्यकर्त्याशी वीचार वीनीमय करून नवीन कार्यकारणि निवडावी-सचिन खरात

Image
परतुर- जालना जिल्ह्यातील प्रमुख नेते मंडळी सोबत बैठक घेऊन चर्चा केल्यानंतर जालना जिल्यातील शिवसंग्रामची जिल्हा कार्यकारिणी सोबतच युवक, महिला, विद्यार्थी, कामगार, किसान, अल्पसंख्याक व सामाजिक न्याय आघाडीसोबत,जिल्ह्यातील सर्व आधाइया आणि सेलच्या जिल्हा, तालुका व शहर कार्यकारिणी काल दिनांक ३१ मार्च २०२१ रोजी आमदार विनायकराव मेटे साहेब यांच्या आदेशाने  बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आगामी काळामध्ये संघटना वाढीसाठी व येणाऱ्या काळातील निवडणुका,महानगरपालिका,जिल्हा परिषद व पंचायत समिती या लक्षात घेऊन जे संघटना वाढीसाठी योगदान देतील अशा सक्षम कार्यकर्त्यांच्या निवडी लवकरच जिल्ह्यातील सर्व नेते, कार्यकर्ते यांच्याशी विचार विनिमय करून जाहीर केल्या जाव्यात   अशी विनंती वीद्यार्थी संघटनेचे माजी तालूकाध्यक्ष सचिन खरात  परतुर यांनी केले आहे