Posts

Showing posts from May, 2021

स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्,राज्य सरकारची याचिका सुप्रिम कोर्टानं फेटाळली

मुंबई:  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण (OBC reservation) रद्द ठरवले आहे. यासंदर्भातील ठाकरे सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालायने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे ग्रामपंचायत, जिल्हापरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना मिळणार राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. हा ठाकरे सरकारसाठी मोठा झटका असल्याचे मानले जात आहे. (OBC reservation in local bodies cancels by Supreme cout) ओबीसींना 27 टक्क्यांच्यावर आरक्षण देऊ नका. 27 टक्के आरक्षणानुसारच जिल्हा परिषदेच्या निवडणुका घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. या निर्णयाला ठाकरे सरकारने आव्हान दिलं होतं. मात्र आता ठाकरे सरकारची ही याचिका फेटाळून लावली आहे. Special Story: ओबीसींची जनगणना भारतीय राजकारणाची कूस बदलणार?; वाचा स्पेशल रिपोर्ट! काय आहे प्रकरण? आरक्षणाची टक्केवारी 50 टक्क्यांवर असल्याप्रकरणी नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. दरम्यान तत्कालीन फडणवीस सरकारने नागपूरसह अकोला, वाशिम, नंदूरबार व धुळे जिल्हा परिषदांना मुदतवाढी दिली. दरम्य

CAAसदर्भात अधीसुचना जारी नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून वाद असताना आता केंद्रीय गृहमंत्रालयाने नवीन अधिसूचना जारी केली आहे.

नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून (CAA) वाद असताना आता केंद्रीय गृहमंत्रालयाने (Ministry of home affairs) नवीन अधिसूचना जारी केली आहे. यानुसार आता अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि पाकिस्तानातून आलेल्या बिगर मुस्लिम शरणार्थींकडून भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अधिसूचनेत गुजरात, राजस्थान, छत्तीसगढ, हरयाणा आणि पंजाबमधील 13 जिल्ह्यात राहणाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. यात हिंदू, शीख, जैन, बौद्ध यांसारख्या बिगर मुस्लिम नागरिकांना नागरिकत्वासाठी अर्ज करता येईळ असं सांगण्यात आलं आहे. अद्याप नव्या सीएए कायद्यांतर्गत नियम तयार नाहीत. सीएए कायद्याच्या माध्यमातून मोदी सरकारने अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चनांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद केली होती. मात्र अजुन याचे नियम तयार झालेले नाहीत. त्यामुळे नागरिकत्वासाठी आधीपासून असलेल्या नियमांतर्गतच नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने नागरिकत्व कायद्या 1955 आणि 2009 मध्ये तयार केलेल्या कायद्यांतर्गत नियमानुसार आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी अधिसूचना जार

शिवराज जी नारियलवाले जालना यांच्या बाबत मुख्यमंत्री,गृहमंत्री यांना तहसील परतुर च्या मार्फत भाजपा युवा मोर्चा परतूर च्या वतीने बबनराव लोणीकर साहेब व राहुल भैया लोणीकर यांच्या सुचणे वरून निवेदन देण्यात आले

Image
परतूर (प्रतीनीधी) पोलिसां कडून सूडबुद्धीने अमानुषपणे करण्यात आलेल्या लाठीचार्ज चा तीव्र शब्दांमध्ये भाजपा युवा मोर्चा परतुर च्या वतीने जाहीर निषेध करत,दोषी पोलीस अधिकाऱ्यावर तात्काळ  कारवाई करण्यात यावी,नसता युवा मोर्चा तीव्र आंदोलन करेल,आसा आशयाचे निवेदन परतूर येथे तहसीलदार रूपा चित्राक यांना देण्यात आले निवेदना पूढे सांगण्यात आले कि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून आजपर्यंत महिला तरुण संत महंत यांच्यासह अनेकांना हा माणूस मारहाण झाल्याचं स्पष्ट झाला आहे हे सरकार महाराष्ट्राचा सरकार आहे की रजाकारी प्रवृत्तीच सरकार आहे हाच खरा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे या महाराष्ट्रात मागील दोन वर्षात पोलिसांना देखील मारहाण झाली परंतु त्यावेळी काही विशिष्ट लोकांचा समुदाय समोर होता म्हणून की काय पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली नाही परंतु भाजपा युवा मोर्चा चा पदाधिकारी याने एखाद्या चुकीच्या बाबी विरोधात आवाज उठवला म्हणून पोलिसांनी भाजपा युवा मोर्चाचे जालना जिल्हा सरचिटणीस शिवराज पहिलवान नारियलवाले या युवकाला अमानुष मारहाण केली आहे या माणूस मारहाणीचा भाजपा युवा मोर्

नारियलवाले मारहाण प्रकरणातील पोलीस निलंबित करा -- काकडे

Image
मंठा(प्रतीनीधी) जालना शहरामध्ये पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन व पोलीस कर्मचाऱ्यांची गुंडगिरी दिनांक 27 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्राने बघितली आहे. शिवराज नारियलवाले या भाजपाच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी लाठ्या-काठ्या तुटेपर्यंत बेदम मारहाण केली होती. या घटनेचा आपण महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने निषेधही व्यक्त केला. भविष्यामध्ये पोलिसांची दादागिरी ही सर्वसामान्य लोकावर दिसून येऊ नये. म्हणून या गोष्टीला आवर घालण्यासाठी पोलिसांची वाढलेली गुंडगिरी थांबवण्यासाठी आपण महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना निवेदन देऊन या घटनेतील संबंधित पोलिस अधिकारी कर्मचारी यांना तातडीने निलंबित करून त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी आपण केली असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेश्वर काकडे यांनी माहिती दिली आहे. कार्यकर्ता कुठल्याही पक्षाचा असो, हि झालेली अमानुष मारहाण व तो बघितलेला व्हिडिओ कोणताही मनुष्य सहन करणार नाही. इतक्या विचित्र पद्धतीने मारहाण करण्याचे आदेश कोणाचे होते? हे सुद्धा तपास

आंबेडकर नगरात घराघरात साजरी झाली तथागत गौतम बुद्ध जयंती !

Image
lपरतूर,दि.26 (प्रतिनिधी) -विश्वशांतीदुत तथागत गौतम बुद्ध  यांची २५८३  वी जयंती बुधवारी (दि.(२६ )  शहरात मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता घराघरात मनोभावे व शांततेने  बुद्धवंदना घेऊन विश्वशांतीदुताला अभिवादन करण्यात आले.       शहरातील डॉ. आंबेडकरनगरात कोरोना नियमांचे पालन करत घरातच जयंती साजरी करण्यात आली.    यावेळी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार यांनी आपल्या कुटुंबासमवेत तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामुदायिक वंदना घेतली. दीपप्रज्वलन करून अभिवादन केले. यावेळी पाडेवार म्हणाले की,सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना महामारीने थैमान घातले आहे.राज्यात कोरोनाचा वाढता प्रभाव व कोरोनामुळे मृत्युमुखी पडणारांची संख्या पाहता शासनाने काही नियम घालून दिले आहेत.अनुयायांनी शासनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.शासनाच्या निर्देशांचे पालन करत तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त सर्व आंबेडकरी अनुयायांनी रस्त्यावर गर्दी न करता आपआपल्या गावातील  बौद्ध विहारात मोजक्याच उपासकाच्या उपस्थिती मध्ये दीपप्रज्वलन करून ब

परतूर येथे वीज कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती ती लावून काम बंद आंदोलन

Image
परतूर(प्रतीनीधी) फ्रन्टलाइन वर्कर घोषित करा या कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागणी करिता परतूर येथील महावितरण कर्मचारी अभियंता संघटना संयुक्त कृती समिती च्या वतीने उपविभाग कार्यालयाचे गेटवर काळ्या फिती लावून काम बंद आंदोलन करण्यात आले वीज कर्मचारी यांना राज्य शासनाने फ्रन्टलाइन वर्कर चा दर्जा देण्यात यावा कर्मचारी व त्यांच्या परिवाराचे प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे, कोरोना महामारीत मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचे वारसांना 50 लाख रुपये अनुदान देण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत या प्रसंगी वीज कर्मचारी अभियंता संघटनेचे पदाधिकारी एन व्ही बेंडाळे, रमेश आढाव, जी ए चंदेल, एम  ए रामटेके, मोरखडे, सय्यद नौशाद, सोहेल, जाधव, नदीम , होंडे, एन बी सोमलकर , के पी कुलकर्णी ईत्यादि कर्मचारी उपस्थित होते.

मुजमुले अँग्रो सर्व्हिसेसचे उदघाटन

Image
.............. परतूर /प्रतिनिधी परतूर शहरातील मुजमुले अँग्रो  सर्व्हिसेस & सोल्युशन  चे शुक्रवारी ता.21 रोजी  उदघाटन सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे व कृषि अधिकारी सखाराम पोळ याच्या हस्ते करण्यात आले यावेळी.मंडळ आधिकारी आकाश माने, नगरसेवक जगन्नाथ बागल, सिदार्थ बंड,द.या.काटे,ऍड विशाल बागल, शबीर ,सतीश चव्हाण,सुधाकर गिरी,राजेश पवार,मुकुंद खरात, रवी बागल,ओंकार माने,दिपक उबाळे,  योगेश बरीदे,अजय देसाई,सय्यद वाजेद ,मुन्ना चितोडा,आशिष गारकर , प्रमोद जईद, सह परीसरातील नागरिक व शेतकरी उपस्थित होते चौकोट... तरुण युवा पिढी ने  नोकरी च्या मागे न लागता व्यवसायात   उतरावे उत्पादन करून वेगळी ओळख निर्माण करावी, रवींद्र ठाकरे,सहाय्यक पोलीस निरीक्षक चौकोट.... वाढती बेरोजगारी बघता तरुण वर्गाने  जमेल तो व्यवसाय करून घराला हातभार लावावा.चांगलं उत्पादन घ्यावे. योगेश बरीदे,पत्रकार

मायक्रो फायनान्स व फायनान्स कंपण्यांच्या वसुली थांबवा - काकडे

Image
मंठा(प्रतीनीधी) महाराष्ट्र राज्यात कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेने हाहाकार ऊडाला आसून अनेक कुटुंबातील सदस्यांना ऊपचारा अभावी आपला जिव गमवावा लागत आसुन गोर गरीब सर्व सामान्य लोकांनी ऊपचार नेमका करायचा कसा? आसा प्रश्न पडलेला आसतांनाच जालना जिल्ह्यातील मायक्रो फायनान्स व फायनान्स कंपण्या सर्व सामान्य व गोर गरीब लोकांना कर्ज वसुलीसाठी वेठीस धरत आहे. हि वसुली तातडीने थांबवावी आसी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेश्वर काकडे यांनी विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना निवेदन देऊन केली आहे. जालना जिल्ह्यातील सर्वच मायक्रो फायनान्स व फायनान्स कंपण्या सर्व सामान्य लोकांना वेठीस धरत आसल्याचा आरोप मनसेचे सिद्धेश्वर काकडे यांनी केला आहे. राज्यात कडक निर्बंध आसतांना देखील व लाॅकडाऊन आसुन देखील हातावर पोट भरणाऱ्या लोकांची  पिळवणूक होत आसुन या फायनान्स कंपन्यांच्या चाजामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. तसेच कुटुंबातील कुटुंब प्रमुखांवर आत्महत्या करण्याची वेळ येऊन ठेपली असताना जालना जिल्हाधिकारी कोणतीही ठोस भूमिका घेत  नसल्याने सिद्धेश्वर काकडे यांनी

शेतकऱ्यांबद्दल पुतना मावशीचे प्रेम दाखवणारे तोंडावर आपटले- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचा महाविकास आघाडी सरकारला टोला,खताच्या सबसिडी मध्ये वाढ केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, खत व रसायन मंत्री सदानंद गौडा व कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचे लोणीकर यांनी मानले आभार,राज्यसरकारने "दानत" दाखवावी, पेरणीसाठी शेतकऱ्यांना सरसकट १० हजार रुपये अनुदान द्यावे - माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची मागणी

Image
परतूर(प्रतिनिधी) आंतरराष्ट्रीय पातळीवर खतासाठी लागणाऱ्या रसायनांच्या किंमतीत वाढ झाली तरीही डीएपी खतांच्या वाढीव अनुदानासाठी १४,७७५ कोटी रुपयांचा बोजा सोसून शेतकऱ्यांना गेल्या वर्षीच्या जुन्याच भावाने हे रासायनिक खत उपलब्ध करून देण्याचा निर्णय मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारने घेतला आहे. खतांच्या किमतीबद्दल बोंब मारणारे आणि केंद्र सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करणारे लोक या निर्णयामुळे तोंडावर आपटले असून शेतकऱ्यांविषयी त्यांना पुतना मावशीचे प्रेम होते ही बाब स्पष्ट झाली आहे या निर्णयाबद्दल भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रातील तमाम शेतकर्‍यांच्या वतीने आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हार्दिक अभिनंदन करतो, मनापासून आभार मानतो अशी प्रतिक्रिया भाजपा नेते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी रासायनिक खतांवर सबसिडी देण्यासाठी ८० हजार कोटी रुपये खर्च केला जातो त्यात आणखी १४,७७५ कोटी रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे डीएपी खतासाठीची सबसिडी १४० टक्के वाढली असून आता शेतकऱ्यांना २४०० रुपये किमतीची ड

पीक कर्जासाठी ऑनलाइन ऐवजी गाव स्तरावरच ऑफलाइन पद्धत राबवा, भाजपा युवा मोर्चाची मागणी

Image
  परतूर (प्रतीनीधी) पीक कर्जासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याची करण्याची आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत.ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन पीक कर्जाचे अर्ज गाव स्तरावर तलाठी किंवा ग्रामसेवक यांच्याकडे जमा करण्याची व्यवस्था करावी अशी मागणी परतूर तालुका भाजपा युवा मोर्च्याच्या वतीने करण्यात आली आहे.  माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांच्या सूचनेवरून तसेच युवामोर्चा प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील सर्व बँकांच्या शाखा व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले आहे.  कोरोना विषाणू संसर्गाचा पार्श्वभूमीवर सध्या जिल्ह्यात सगळीकडे संचार बंदी लागू आहे. ग्रामीण भागात ऑनलाइनच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत.अशा स्थितीत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. अर्ज ऑनलाइन करण्यासाठी शेतकाऱ्यांकडून १०० रुपये एवढे शुल्क खाजगी दुकानदारांकडून आकारले जाते. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. शिवाय एकाच व

केंद्र सरकारच्या भाववाढीच्या विरोधात परतूर काँग्रेस कमिटीच्या वतीने उपविभागिय अधिकाऱ्यांना निवेदन

Image
परतूर(प्रतीनीधी)  वाढत्या खतांच्या किमती व डिझेल पेट्रोल च्या दरवाढीविरोधात माजी आमदार सूरेशकुमाार जेथलीया यांच्या मार्गदर्शना खालि युवा नेते नितीन जेथलिया यांच्या नेतृत्वात परतूर काँग्रेस कमिटी च्या वतीने केंद्र सरकारने केलेल्या रासायनिक खतांच्या व पेट्रोल, डिझेल दरवाढीचा जाहीर निषेध करत उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष बाबासाहेबजी गाडगे,जि.प.सदस्य इद्रंजीत घनवट,युवक अध्यक्ष लक्ष्मणजी शिंदे, उपनगराध्यक्ष सादेक भाई खतीब,बाजीराव खरात, नगरसेवक बाबुराव हिवाळे,राजेशजी भुजबळ,सिध्दार्थ बंड,तारेख सिध्दीकी,अविनाश शहाणे,मधूकर झरेकर,गोविंद वाशिंबे,मोसिन बागवान,पाडुरंग गाडगे ,मतीन कुरेशी, विकास झरेकर,उध्दव बोनगे इत्यादी उपस्थित होते

सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला नंतर मराठा समाजाला सरकारने न्याय दयावा, अन्यथा आंदोलन अटळ आहे याची जाणीव शासनास व्हावी म्हणून हे " इशारा निवेदन "

Image
परतूर(प्रतीनीधी) मराठा समाजाला अनेक वर्षाच्या संघर्षाच्या नंतर मिळालेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने 5 मे 2021 रोजी रद्द केले. मराठा आरक्षणाची सर्वोच्च न्यायालयातील सुनवणी दरम्यान शासनाने व मराठा समाजाचे विषय हाताळणारे मंत्री ना. अशोकराव चव्हाण यांनी योग्य ती खबरदारी घेतली नाही, व्यवस्थीत नियोजन केले नाही. सर्वांना विश्वासात घेतले नाही, म्हणून एकूणच सरकार व श्री. चव्हाण यांनी मराठा आरक्षण गांभियाने घेतले नाही म्हणूनच मराठा आरक्षण रद्द झाले आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र भर असंतोष निर्माण झालेला आहे. समाजाचे आणि पुढील पिढीचे भविष्य या मुळे उध्वस्त झाले आहे याचे सोयरसुतक श्री. चव्हाण व सरकार ला अजिबात नाही. आरक्षण रद्द झाल्यानंतर शासनाने व आपण मुख्यमंत्री या नात्याने मराठा समाजाला खालील प्रमाणे निर्णय घेवुन न्याय दयावा. निर्णय 1) मराठा समाजाला त्वरीत आर्थिक दृष्टया दुर्बल घटकाचे केंद्र शासनाचे 10 % आरक्षण देण्यासाठी शासनाने त्वरीत G.R. काढावा. 2) मराठा समाजाला ओबीसी (OBC) समाज बांधवा प्रमाणे आरक्षण वगळता इतर सर्व सोई सवलतो देण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने आर

विज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर जाहिर करा-कॉ.आर.बी.आढाव

Image
      परतूर(प्रतीनीधी) विज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून घोषीत करण्यात यावे आशि मागणि वीभागिय सचिव कॉम्रेड रमेश आढाव यांनी केली                 परतूर  येथे विज उद्योग क्षेञातील काम करणारे सर्व कर्मचारी,अभियंते,अधिकारी यांना महाराष्ट्र शासनाने फ्रंटलाईन वर्कर म्हणून जाहिर करावे.लसीकरणाची सुविधा प्राधान्याने उपलब्द करुन देण्यात यावी.विज कर्मचारी यांच्यावर कोरोना आजारपणात बेडची उपलब्धता करुन देण्यात यावी.तसेच औषधोपचाराची सुविधा अधिक प्राधान्याने पुरवण्यात यावी.या मागण्यांसाठी महावितरण कंपनीच्या परतूर उपविभागीय कार्यालयासमोर काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली.       यावेळी  .एन.व्ही.बेंडाळे(उपकार्यकारी अभियंता),.प्रविण गणेर (सहाय्यक अभियंता),मंगेश रामटेके(सहाय्यक अभियंता) कॉ.आर.बी.आढाव(विभागिय सचिव),कॉ.के.पी.कुलकर्णी,कॉ.नाथा साकळकर,कॉ.किसन यादव,कॉ.योगेश मोरे,कॉ.बि.एस.दोन्डे,कॉ.मनोज शिंदे,कॉ.सय्यद नौशाद व इतर सभासद व कर्मचारी उपस्थित होते

सेवली येये रिचार्ज शाप्ट च्या कामासाठी आ.लोणीकरांनी केला 25 लाखाचा निधी मंजुर, ज्ञानेश्वर शेजुळ यांनी केले उद्घाटन..

Image
* सेवली {प्रतिनिधी}. नानाजी देशमुख कृषि संजिवनी योजने अंतर्गत आज जालना तालुक्पातील सेवली येथे रिचार्ज शाॅफ्ट च्या कामाचा शुभारंभ करण्यात आला असुन या कामासाठी मा.मंत्री,आमदार बबनराव लोणीकर यांनी 25 लाख रुपयाचा निधी मंजुर करुन दिला आहे.व या कामासाठी भाजपा युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुलभैय्या लोणीकर यांनी विशेष प्रयत्न केले असुन आज भा.ज.पा.चे जालना जिल्हाउपाध्यक्ष, ज्ञानेश्वर {माऊली} शेजुळ यांनी या कामाचे उद्घाटन केले आहे. यावेळी ज्ञानेश्वर शेजुळ म्हणाले कि रिचार्ज शाॅफ्ट च्या अॅक्टिविटीमुळे नाल्याच्या मध्येभागी सिमेंट नाल्याजवळ बोअर घेउन त्यामध्ये दगड,विटा,वाळु भरुन त्या बोअरचे पुनर्भरण केले जाणार असुन त्यामुळे पावसाळ्यात  व नाल्यात पाणी असेपर्यंत या बोअरचे पुनर्भरण होणार आहे.त्यामुळे आसपासच्या परिसरातील विहिरी व बोअरवेलच्या पाणी पातळीमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ होणार असल्याची सविस्तर माहिती ज्ञानेश्वर शेजुळ यांनी यावेळी उपस्थितांना दिली. यावेळी भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाअध्यक्षा श्रीमती जिजाबाई जाधव,सरपंच शे.नविदभाई, उपसरपंच श्रीमती निलाबाई खंदारे,दिलीप जोशी,मा.सरपंच राजु

माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडून परतूर, मंठा, नेर ग्रामीण रुग्णालयांसाठी दीड कोटी रुपयांचा निधी,आय सी यू व्यवस्थेसह सिटीस्कॅन व्हेंटिलेटर बेड एक्स-रे मशीन आदी सुविधा होणार उपलब्ध,*परतूर ग्रामीण रुग्णालयात कोरोना हॉस्पिटलच्या अठरा ऑक्सीजन खाटांचे उद्घाटन,3054 व 25/15 चा आमदारांना देण्यात येणारा निधी ग्रामीण रुग्णालयात अद्यावत सुविधा वाढवण्यासाठी सरकारने खर्च करावा

Image
 परतूर (प्रतिनिधी परतूर मंठा विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची गैरसोय होऊ नये या दृष्टीने राज्याचे माजी मंत्री व परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून दीड कोटी रुपये निधी जाहीर केला असून या निधीमधून परतूर मंठा व नेर येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये सिटीस्कॅन मशिन ,व्हेंटिलेटर बेड, एक्स-रे मशीन, सोनोग्राफी मशीन उपलब्ध करून देणार असल्याचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले  ते परतूर येथे  ग्रामीण रुग्णालयातील 18 ऑक्सिजन बेडचे कोरोना हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते  पुढे बोलताना ते म्हणाले की कोरोना रुग्णांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देणे करिता सर्वप्रथम आपण आपल्या आमदार फंडाचा निधी या कामासाठी खर्च करीत असल्याचे सांगितले कोरोना चा वाढता प्रादुर्भाव ग्रामीण भागामध्ये वाढती लोकसंख्या ही गोष्ट लक्षात घेऊन आपण हा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले पुढे बोलताना ते म्हणाले की जिल्ह्यातील तालुका स्तरावर कोविड हॉस्पिटल नसल्यामुळे रुग्णांना थेट जालन्याला जावे लागते त्यामुळे जिल्ह्यावरील रुग्

तालूका स्तरीय दिव्यांग समितीच्या सदस्य पदी युवा सेना शहरध्यक्ष राहुल कदम यांची निवड

Image
==================== परतुर /प्रतिनिधी  तालुका स्तरीय दिव्यांग समितीचे  नुकतीच. जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश  टोपे यांनी तालुका स्तरीय दिव्यांग समिती घोषित केली आहे. यामध्ये परतुर तालुक्यातील शिवसेना युवासेना शहर अध्यक्ष  राहुल कदम यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली, तसेच अपंग बांधवा साठी हिरीरीने काम करणारे बजरंग वैष्णव यांची ही  दिव्यांग समिती परतुर कार्यकारणी मध्ये निवड करण्यात आली आहे. आबासाहेब देशमुख यांची कऱ्हाळा सर्कल मधून दिव्यांग  समिती वर निवड केली आहे. तसेच प्रभाकर खंदारे यांची अंजनगाव सर्कल मधून निवड करण्यात आली आहे .यामध्ये दिव्यांग समिती  सदस्य मनुन निवड झालेल्याचे परतुर तालुक्यातुन सर्वत्र कौतुक केले जात आहे..

महा"वसुली" सरकारनेच मुद्दामहून न्या.गायकवाड समिती अहवालाची ४००० पाने गहाळ केली, उच्चस्तरीय चौकशी करण्याची लोणीकर यांची मागणी,न्या. गायकवाड समितीच्या अहवालाची ४००० पाने कुठे आहेत? - माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचा सवाल.....अन्यथा महा"वसुली" सरकारला मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल- लोणीकर यांचा राज्यसरकारला इशारा

 परतूर(प्रतिनिधी) तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणाचा लढा लढताना मा. उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या बाजूने निर्णय झाला. अभ्यासपूर्ण मांडणी आणि परिपुर्ण माहितीच्या जोरावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तोपर्यंत मा.सर्वोच्च न्यायालयात या कायद्याला स्थगिती मिळाली नाही. मात्र, राज्य सरकारच्या कुरघोडी राजकारणामुळे आणि समन्वयाच्या अभावामुळे मराठा आरक्षण रद्द झाले आहे. मराठा समाजाच्या मनात याअगोदरच शंकेची पाल चुकचुकली होती देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार सांगून देखील  विद्यमान महा"वसुली" सरकारने लार्जर बेंचकडे कित्येक दिवस पुनर्विचार याचिका दाखल केली नाही. गायकवाड समितीचा अहवाल हा मराठा समाजाच्या बाजूने एकतर्फी असल्याबाबतचे मत मा.सर्वोच्च न्यायालयाने मांडले आहे त्याबाबत महाराष्ट्र सरकारच्या वतीने बाजू मांडणाऱ्या वकिलांनी हा अहवाल एकतर्फी नाही हे मा.सर्वोच्च न्यायालयासमोर मांडणे अपेक्षित होते परंतु गायकवाड समितीच्या अहवालातील ४००० पाने गहाळ झाल्यामुळे वकिलांना मांडणे शक्य झाले नाही. विद्यमान महा"वसुली" सरकार

महाराष्ट्र सरकारने योग्य बाजू सुप्रीम कोर्टात न मांडल्याने मराठा आरक्षण रद्द झाले-आमदार बबनराव लोणीकर

Image
सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण आज रद्द करण्यात आले देवेंद्रजी फडणवीस तत्कालीन मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी फडणवीस व आम्ही सर्व सहकारी यांनी विधानसभा मध्ये आरक्षण संबंधित कायदा केला जो एकमताने मंजूर करण्यात आला. मराठा आरक्षण साठी, मराठा समाजासाठी जे जे होईल ते प्रामाणिकपणे मराठा आरक्षण न्याय मिळवून देण्याचे काम तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व सर्व सहकारी मंत्री मंडळाने  केले परंतु आताच्या राज्यसरकारने मराठा आरक्षण बाबत योग्य न्यायिक भूमिका न घेतल्याने सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केले, वारंवार वकील अनुपस्थित राहणे, तारखा विनाकारण वाढवून मागणे अश्या अनेक गोष्टी या सरकारने केल्या. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाची योग्य बाजू न मांडल्यानेच मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केले आजचा दिवस संपूर्ण मराठा समाजासाठी दुर्दैवी आणि काळा दिवस आहे.

श्रीष्टी_आरोग्य_उपकेंद्रावर_भजयुमोच्या वतीने रक्तदान,62 रक्तदात्यांनी केले रक्तदान,माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व युमो महामंत्री राहुल लोनिकरांच्या नेतृत्वात युवमोर्चाने घेतला पुढाकार

Image
परतूर (प्रतिनधी) कोरोना संकट काळात सर्वत्र रक्त तुटवडा निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर माजी मंत्री बबनराव लोणीकर मार्गदर्शनाखाली, व भाजयुमो प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजयुमो ता #अध्यक्ष_शत्रुघ्न_कणसे,व श्रीष्टी चे सरपंच जितू अण्णा अभुरे यांनी पुढाकाराने रक्तदान शिबिर संपन्न झाले.  प्राथमिक आरोग्य केंद्र श्रीष्टी येथे संपन्न झालेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन भाजपा तालुकाध्यक्ष रमेशराव भापकर,यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी,पं स सदस्य शिवाजी पाईकराव,गटविकास अधिकारी श्री अंकुशजी गुंजकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ जाहेद सय्यद,आष्टी पोलीस निरीक्षक श्री सुभाष सानप, वसंतराव बेरगुडे यांची  प्रमुख उपस्थिती होती या रक्तदान शिबिरात 62 रक्तदात्यांनी रक्तदान करून देशसेवेस हातभार लावला भाजपा युमो तालुकाध्यक्ष शत्रुघ्न कणसे व भाजपा व युवा मोर्चा परतुर, यांच्या पुढाकाराने राज्यातील रक्ताची भीषण टंचाई लक्षात घेत संपन्न झालेल्या रक्तदान शिबिरामुळे कोरोना काळात जनसेवा करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे संयोजकाच्या वतीने सांगण्यात आले यावेळी सोबत  सरपंच केशव ढवळे, युवा