Skip to main content

Posts

Showing posts from November, 2021

ह भ प तुकाराम महाराज मुंढे शास्त्री यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली वाघाळा येथील अंखड हरीनाम सप्ताहची सांगता

तळणि(रवी पाटील)  काकूलती येता हरी  क्षणभरी निवडीता ॥१॥ तुमची मज लागली सवे  ठायीचे नवे नव्हो गडी ॥ धृ ॥ या जगदगुरू तुकाराम महाराजाच्या काल्याच्या प्रकरणातील मांडणी करणाऱ्या अंभगावर सुंदर निरूपण केले भगवान पर त्माची उपासना करत असत असताना दोन प्रकार सागितले आहे एक परमात्मा सगून मानला आहे तर एक निर्गुन मानला आहे शास्त्र त्याला निर्गुन म्हणतय आणि संत त्याला संगून म्हणतात संत ज्ञानोबारायाना सुध्दा हा प्रश्न पडला होता तुज सगून म्हणू की निर्गुन रे पण संताच्या नंतर लक्षात आले सगून निर्गूनी गोविंदू रे ज्याला शास्र अव्यक्त म्हणतात त्यालाच संत व्यक्त म्हणतात व्यक्त आणि अव्यक्त तुचि एक निभ्रांत हे निळोबारायाचे प्रमाण सिद्ध आहे भक्ती साधना ही व्यक्त होणारी साधना साधना असावी योग साधना ही अव्यक्त साधनात होते तर भक्ती मार्गाने केलेली साधना ही व्यक्त साधनांना ने प्राप्त होईल संतांनी सागीतल्या प्रमाणे निर्गुण परमात्मा हा प्राप्तीचा विषय नसतो निर्गुण हा अनुभव याचा असतो आणि सगूण प्राप्त करून घ्यायचा असतो मनष्य जर निर्गुणाच्या अनूभुतीचा विचार करू लागला तर मनुष्य जीवनात साधना खडतर आहे

आंबेडकर नगरात संविधान दिवस उत्साहात साजरा,

परतुर प्रतिनिधी - जालना जिल्ह्यातील परतुर शहरातील आंबेडकर नगरात डॉ बाबासाहेब आंबेडकर सभाग्रहात भारतीय संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, प्रथम सोरूप डॉ ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार ईज्जु कुरेशी यांच्या हस्ते पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, यावेळी मलीक कुरेशी,गुलाब पाडेवार, घुगर वाकळे, रामजी पाडेवार, ऊत्तम घुगे, मोसीन कुरेशी, सायद अन्सारी, सैयद मुन्ना, हार्शद पौळ, करण पाडेवार, शिवाजी उबाळे, बबलु पाडेवार, रतन घुगे,मिलींद दंवडे, मनोज हिवाळे,

परतूर येथे संविधान दिन उत्साहात साजरा

परतूर (प्रतिनिधी) येथील आंबेडकर नगर मध्ये शुक्रवारी ता.26 रोजी सकाळी नऊ संविधान दिन साजरा करण्यात आला.                    यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.यावेळी प्रभारी नगराध्यक्ष सादेक खतीब,नगरसेवक सिद्धांथ बंड, द.या.काटे,शिवाजी पांडेवार,प्रकाश पांडेवार,गुलाब बंड,दिपक भदर्गे,सुधाकर मुजमुले,सुनील पवार,दिपक मुजमुले, विलास पांडेवार,उत्तम घुगे,अर्जुन भदर्गे,अशोक बंड, प्रसाद पोळ,रवी पाडेवार, आकाश दवनडे,हर्षद पोळ,मिलींद बंड, बाळू पाडेवार,प्रवीण बंड,राहुल मुजमुले सह आदींची यावेळी उपस्थिती होती. दरम्यान यावेळी प्रमुख पाहून प्रभारी नगराध्यक्ष सादेक खतीब याना संविधान ग्रंथ भेट देण्यात आला.तसेच संविधानाचे महत्त्व पटवून दिले. ----------------------

मंठा येथे युवा सेनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर

 मंठा (सुभाष वायळ)दि. 25 हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे  पुजन करुन ए .जे .पाटील बोराडे  शिवसेना जिल्हाप्रमुख जालना यांच्या हस्ते रक्तदान शिबिरास सुरवात करण्यात आली यावेळी उपस्थित संजयजी देशमुख  पोलिस निरीक्षक मंठा  दिपक बोराडे , युवासेना उप जिल्हाप्रमुख जालना.डिगांबर बोराडे, युवासेना तालुका प्रमुख मंठा सभापती संतोषराव वरकड ,पप्पु दायमा ,डाॅ संतोष पवार, किरण सुर्यवंशी,अशोक घारे संदिप वायाळ,भागवत चव्हाण, विष्णु बहाड, एकनाथ अर्जून आकाश मोरे,दत्ता काळे ,कृष्णा वरणकर ,गोपी गायकवाड ,पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.

वाघाळा येथील अंखंड हरीनाम सप्ताह , सहाव्या दिवशीचे हरी कीर्तन सेवा मुक्ताबाई संस्थानचे मठाधिपती ह भ प विशाल महाराज खोले

तळणी(रवी पाटील) येथून जवळच असलेल्या वाघाळा येथील अंखंड हरीनाम सप्ताह मधील सहाव्या दिवशीचे हरी कीर्तन सेवा  मुक्ताबाई संस्थानचे मठाधिपती ह भ प विशाल महाराज खोले यांची झाली  अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा ॥१ ॥ न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे  या जगदगुरू तुकाराम महाराज्या अंभ गावर सुंदर निरूपण केले मनुष्याच्या आयुष्यात योग्य ठिकाणी घडलेले जिवनाचे अनुसरण घंडल्यानंतर मिळणारा प्रसाद काय मिळू शकतो यांच चितंन महारांजांनी या अभगातुन व्यक्त केले आहे मनुष्याच्या आयुष्यात अनुसरण किती फलदायी  असू शकते याची कारणीमीमांसा महाराजानी या ठिकाणी व्यक्त केली आहे मृत्यू लोकांच्या प्रवासाबाबतचे धोरणात्मक धोरण यातून महाराजांनी व्यक्त केले प्रत्येक मानवाला मरण हे अटळ आहे मृत्यू लोकात मनुष्याला मरणाची तारीख वेळ माहीती नसली तरी ते अटळ आहे कारण मुत्युलोकात कोणीही अमर राहू शकत नाही मूत्यू लोक सोडण्याचे अनेक दरवाजे आहेत काहीनी हत्येने मूत्यूलोक सोडला  तर काही नी आत्महत्येने सोडला काही नी अकाली काहीनी कालमरणानी तर काहीनी आत्म त्यागानी काहीनी समर्पनानी तो सोडला आहे साधुंसंतांनी समाधीने हा मुत्यु लोक सोडला आहे मृत्

कितीही अडचणी आल्यातर शेतकरी हितासाठी कारखाना सुरु होणे गरजेचे - फुलारी

जालना (प्रतीनीधी)सहकारी साखर कारखाना हा शेतकरी हितासाठी सुरु होणे गरजेचे असुन कोणत्याही उद्योगाची चाके फिरली म्हणजे परिसरातील शेतकर्‍यांची आर्थीक उन्नती, त्या भागाची प्रगती होत असते हे सर्वज्ञात आहे. जालना साखर कारखान्यावरुन सध्या भाजपा सेनेला अडचणीत आणन्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसुन येते. यात भाजपाचा थेट फायदा नसला तरी खा. रावसाहेब दानवे यांचे भविष्यातील प्रतिस्पर्धी संपवणे किंवा त्यांच्या मागे चौकशीचे शुक्लकाष्ठ लावुन विरोधक कमकुवत करणे हा हेतु आहे. अशातच माजी खा. किरीट सोमय्या यांची आणि माझी राज्यातील एका विद्यमान मंत्री आणि अधिकारी यांच्या विरोधातील तक्रारी संदर्भात चर्चा झाली, तसेच औरंगाबाद येथील एक तक्रारदार आणि सोमय्या यांची भेट देखील त्याच वेळी झाली तेव्हा त्यांच्या हातातील काहि दस्तवेज आपल्या हातात होते आणि हे छाचाचित्र व्हायरल झाले यातुनच रामनगर सहकारी साखर कारखान्याच्या भागधारकांची त्यांच्या कोडावळ्यातील काहींनी गैरसमजुत करुन दिली. यात त्यांचा आपल्या कोंडावळ्यातील कोणावर किती विश्‍वास आहे हा त्यांचा प्रश्‍न असुन आम आदमी पार्टी जेव्हा एखादी तक्रार करते तेव्हा ती सर्वाना जाह

तळीरामांची पोलीसांच्या वाहनाला धडक गुन्हा दाखल पधरा दीवसाची शिक्षा

मंठा(रवी पाटील) तालुक्यातील सेवली पोलीस ठाण्याची विभागीय गस्त असल्याने सपोनि उबाळे हे त्याच्या कर्मचार्यासह शासकीय वाहन क्र एम एच बी क्यू ५२३९ ने पोलीस ठाने मंठा येथे भेट देऊन परत जात असताना मंठा जालना रोडवरील बरबडा पाटीजवळ समोरून येणाऱ्या महीद्रा झायलो एम १२ जी झेड ५९३४ क्रंमांकाच्या वाहन चालकाने दारूच्या नशेतच पोलीसाच्यां गाडीला समोरुन धडक देऊन सरकारी वाहनाचे नुकसान केले असल्याने अंकुश खरात यांच्या फिर्यादीने मंठा पोलीस ठाणे येथे गुरन ३८३ / २०२१ कलम २७९ ४२७ भादवी सह कलम १८५ मोटार वाहन कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला मंठा पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या आदेशाने आरोपीस अटक करण्यात आल्यानंतर संदर गुन्हाचा  २४ तासाच्या आत तपास करून दोषारोप पत्रासह न्यायालयात दाखल केले असता प्रथमवर्ग न्यायालयाचे न्यायाधीश याच्या समोर दाखल करून न्यायालयाने कलम २७९ मध्ये १००० रुपये दंड व भादवी कलम ४२७ मध्ये २०० रू दंड व कलम १८५ मोटर वाहन कायद्यानुसार २०००रू दंड असा एकूण ३२०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला दंड न भरल्यास पंधरा दिवसाची कैद सुध्दा यावेळी न्यायालयाकडून सुनावण्यात आली  सदर कामगिरी जालना पो

लातूरच्या अधिवेशनास मोठया संख्येने उपस्थित राहावेजिल्हाध्यक्ष दिगंबर गुजर यांचे आवाहन

परतूर :(रवी पाटील) महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने येत्या रविवार दि.२८ नोव्हेंबर रोजी लातूर येथे आयोजित करण्यात आलेल्या अधिवेशनास जालना जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या पत्रकारांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जालना जिल्हाध्यक्ष दिगंबर गुजर यांनी केले आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना गुजर यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने येत्या रविवार दि.२८ नोव्हेंबर रोजी मराठवाडा विभागातील पहिले अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, प्रदेश सरचिटणीस विश्वास आरोटे, प्रदेश संघटक संजय भोकरे, इलेक्ट्रॉनिक मीडिया विभागाचे प्रदेशाध्यक्ष रणधीर कांबळे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. इतरही अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहे. लातूर शहरातील बार्शी रोडवरील दयानंद सभागृहात सकाळी १० वाजता या अधिवेशनास मराठवाड्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जालना जिल्हाध्यक्ष दिगंबर गुजर यांनी केले आहे. चौकट राज्य, विभाग, जिल्हा, तालुका तसेच गावपातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांना दररोज अनेक समस्यांचा साम

शिक्षण संस्थचे ह भ प अर्जुन महाराज बादाड यांच्या किर्तन संपन्न

तळणी (रवी पाटील) जवळच असलेल्या कानडी येथील कानीफनाथ मंदीरात आज मंगळवारी संकष्टी चतर्थी निमीत्य नेमिनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्थचे ह भ प अर्जुन महाराज बादाड यांच्या किर्तनाचे आयोज करण्यात आले होते चतुर्थी निमीत्य मंदीरातील गणेश मूर्तीला नवीन चांदीचा मुकुट प्रकाश तात्या खंदारे यांच्या वतीने देण्यात आला   या किर्तन प्रंसगी जगदगुरू तुकाराम महाराज यांच्या  भक्ती आम्ही केली सांडूनी  उद्वेग पावलो हे संग सुख याचे ॥१॥ सुख आम्हां झाले धरीता यांचा संग पळाले उद्वेग सांडूनिया ॥२॥ तुका म्हणे सुख बहु झाले जिवा घडली या सेवा विठोबाची ॥३॥  या अंभगावर सुंदर निरुपण केले कलयुगातील मनुष्य आज काल भौतीक सुंखाचा जास्त विचार करु लागल्याने तो त्या सांसारीक आयुष्यातच गुरफटत चालला असल्याने त्याला भक्ती मार्गाचा विसर पडला आहे भक्ती मार्गातील सुखच इश्वरी प्राप्तीचा मार्ग आहे तो मनुष्याने स्वीकारला पाहीजे मनुष्य सध्या संसारीक मार्गाने सुख शोधण्याचा प्रयत्न जरी करीत असला तरी त्या मार्गावर सुख सापडणार नाही कारण चुकीच्या मार्गाने सुख हे कधीच सापडत नाही त्याला जर सुखाची प्राप्ती करायची असेल इश्वरी सत्ता भो

कार्तीक मासानिमित्त तळणि येथे अंखड हरीनाम सप्ताहाचे आयोजन

मंठा (रवी पाटील) तालूक्यातील तळणी येथील श्री विठ्ठल रुक्मीणी मंदीर संस्थान कडून मंठा तालूक्यातील तळणी येथील श्री विठ्ठल रुक्मीणी मंदीर संस्थान कडून मंठा तालूक्यातील तळणी येथील श्री विठ्ठल रुक्मीणी मंदीर संस्थान कडून कार्तिक मासानिमित्य अंखड हरिनाम सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे या सप्ताहची दुसरी किर्तन सेवा श्री नेमिनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्थेमधील बाल किर्तनकार ह भ प योगेश महाराज गंन्डे याची झाली असून या बालकिर्तनकाराने अनेक विषयाना हात घालू.न उपस्थीताना मञ मुग्ध केले जगदगूरू तुकाराम महाराज याच्या 👇या अंभ गावर सुंदर निरुपण केलेस्वामिकाज गुरुभक्ती । पितृवचन सेवा पति ॥१॥ हे चि विष्णूची महापूजा । अनुभाव नाहीं दुजा ॥ध्रु.॥ सत्य बोले मुखें । दुखवे आणिकांच्या दुःखें ॥२॥ निश्चयाचें बळ । तुका म्हणे तें च फळ ॥३॥ महारांजानी स्वामी भक्त्ती कशी असावी याचे अनेक इतिहास कालीन दाखले दिले स्वामी विवेकांनद रामकृष्ण परमंहस समर्थ रामदास स्वामी आणि शिष्य कल्याण छञपतीचे धर्मगूरू छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांचे अनेक दाखले दीले मनुष्य जीवनात  एखादा तरी गुरू असला पाहीजे गुरूच माणसाच्या आयुष

गोर बंजारा धर्मपीठ पोहरादेवीला होणार धर्म परिषद गोरधर्म व गोरबोली मान्यतेसाठी समाजाने एकत्र यावे - जगदीश राठोड,संचालक नेत्रा ग्रुप

 मंठा(सुभाष वायाळ) गोर बंजारा धर्मपीठ,पोहरागड येथे २१ व २२ नोव्हेंबर २०२१ रोजी धर्म परिषद व संस्कृतीक सोहळ्याचे आयोजन केले आहे.     या परिषदेसाठी जालना जिल्ह्यातील बंजारा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे अहवाल नेत्रा ग्रुपचे संचालक जगदीश राठोड यांनी केले आहे. यासाठी  तिर्थक्षेत्र पोहरागड (पोहरादेवी) येथील गोरबंजारा धर्मपीठ संत सेवालाल महाराज पुण्यभूमि पोहरादेवी येथे देशभरातून हजारो साधुसंत, महंत,भक्तगण व समाज बांधव उपस्थित राहणार आहेत. या दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून,धर्मपीठ तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे भव्य गोरधर्म परिषद भरणार आहे.यावेळी गोर धर्म पीठाधीश्वर परमपूज्य बाबुसिंग महाराज,गोपाल चैतन्य बाबाजी, सिद्धलिंग स्वामी,प्रेमसिंग महाराज,बळीराम महाराज, दुर्गादास महाराज,कबीरदास महाराज,जुगनू महाराज,भोजू महाराज,गोपाल महाराज,धनु महाराज, हरिशरणानंद महाराज, विशुद्धानंद महाराज,मथुरा.लक्ष्मण महाराज,आथनी.पंकजपाल महाराज,दादाराव महाराज,यशवंत महाराज,परशुराम महाराज,सुनील महाराज,जनार्दन महाराज,सेना महाराज, अंबरसिंग महाराज,योगानंद

भरधाव वेगाने चालणाऱ्या दोन वाहनावर मंठा पोलीस निरीक्षक संजय देशमुख याची कारवाई

तळणी (रवी पाटील) तळणी मंठा रोडवरील पोस्टे मंठा अतर्गत दुरक्षेञ तळणी याच्या हद्दीत भरधाव वेगाने व निष्काळजीपनाने गाडी चालवणाऱ्या  आनंद भंगवान कागंणे ( वय ३४ )चालक रा कांगणेवाडी ता अंबेजोगाई जि बिड याच्यावर कलम २७९ भादवी सहकलम १३४ १७७ १८४ मोटार वाहन कायद्या नुसार पोना सुभाष राठोड याच्या फिर्यादीने हा  गुन्हा दाखल करण्यात आला सदर वाहनाच्या पासीग क्रंमाकात खोडातोड करण्यात आल्याचे निदर्शनास आले तसेच या वाहनामध्ये मानवी जीवीतास धोकादायक असलेली थर्मल पावडरची निष्काळजीपणे वाहतुक करताना दिसुन आले सदर थर्मल पावडरची वाहतूक करण्याची कुठलीच परवानगी  नसल्याचे तपासणी दरम्यान आढळून आले असुन संबंधीत गुन्हयाचा तपास सुभाष राठोड हे करत असुन दुसऱ्या वाहनावरी शेख लतिफ शेख बशीर वय( ४७ ) रा देव पेठ बालाजी मंदीर वाशीम याच्यावर सुध्दा कलम २७९ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा तपास संदीप घोडके याच्या कडे देन्यात आला आहेया दोनही वाहनाला व वाहनचालकाना कोर्टात हजर केले असता दंडात्मक कारवाई कोर्टाकडून  करण्यात आली आहे मंठा तळणी रोडवर वाहनांच्या किरकोळ अपघात्ताच्या संख्येत वाढ झाली आहे सिमेन्ट

मंठा तालुक्यातील तळणी प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्काळ कंत्राटी भरती करा- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची मागणी

मंठा (सुभाष वायाळ) -दि.15 तळणी हे मंठा तालुक्यातील सर्वात शेवटचे विदर्भाच्या सिमेजवळील गाव असून या ठिकाणी आरोग्य सुविधांचा खूप मोठा अभाव आहे परिसरातील साधारणता ४० पेक्षा अधिक गावांची बाजारपेठ म्हणून तळणी या गावाकडे बघितले जाते  शासनाने खूप मोठा खर्च करत भौतिक सुविधा उपलब्ध करून दिले आहे परंतु कर्मचारी नसल्यामुळे रुग्णांची मोठी अडचण झाली आहे अशा परिस्थितीत कंत्राटी स्वरूपात कर्मचाऱ्यांची तात्काळ भरती करण्यात यावी. अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे केली आहे मागील पंचवार्षिक मध्ये लोणीकर यांनी स्वतः प्रयत्नपुर्वक तळणी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून घेतले त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला व प्राथमिक आरोग्य केंद्राची भव्य इमारत उभी राहिली आहे परंतु अद्याप पर्यंत त्या आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आलेली नाही परिणामी परिसरातील नागरिकांची व रुग्णांची प्रचंड हेळसांड होत आहे असेही लोणीकर यांनी पत्रात म्हटले आहे परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा मिळत नाहीत, भौतिक सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या असल्या तरी त्या व

एसटी महामंडळाचे शासकिय सेवेत विलीनीकरण करा मनसे विद्यार्थी सेनेचे ठिय्या आंदोलन

मंठा तालुक्यातील चौफुली बेलोरा फाट्यावर मनसे संस्थापक अध्यक्ष श्री राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारिणी सदस्य सिध्देश्वर काकडे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करुन एसटी कर्मचारी यांच्या संपाला मनसे विद्यार्थी सेनेकडून जाहिर पाठिंबा देण्यात आला आहे. यावेळी या आंदोलनाची दखल परतुर उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी दखल घेत आंदोलन ठिकाणी मंडळ अधिकारी श्री.गणेश कुलकर्णी यांना पाठवुन निवेदन स्विकारले आहे. हे निवेदन एसडीएम मार्फत राज्य सरकारला देण्यात आले आहे. सटी महामंडळाला शासकीय सेवेत रुजू करुन एसटी कर्मचारी यांना पगार वाढ करुन शासकीय सेवा पुरवाव्यात आसी मागणी मनसे विद्यार्थी सेनेचे सिध्देश्वर काकडे यांनी केली आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना मंठा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, आदित्य केंधळे, प्रवीण केंधळे, आदी उपस्थित होते.

मंठा तालुक्यातील नायगाव येथे कायद्याविषयी शिबिरास गावकर्यांचा उस्फूर्त प्रतिसाद

मंठा(सुभाष वायाळ)दि.15 तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायत मध्ये आजादी का अमृत महोत्सव 75  अंतर्गत  महाराष्ट्र राज्य सेवा प्राधिकरण मुंबई च्या कायद्या विषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीर ची सुरवात मंठा न्यायालयाचे न्यायाधीश माननीय.श्री. ए.के.शर्मा साहेब,शासकीय वकील मुस्ताक शेख ॲड.संतोष देशमुख, ॲड.राजेश खरात, ॲड.ए. ए.कुलकर्णी,ॲड अजय वायाळ, ॲड.सोहेल पठाण,सरपंच गजानन फुपाटे, अविनाश राठोड, इतरांनी  पंडित जवाहलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण  करून करण्यात आले.          कार्यक्रमाच्या सुरुवातीला बालक दिनानिमित्त न्यायाधीश साहेबांनी लहान मुलाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.         न्यायाधीश साहेबांनी आपल्या भाषणामध्ये कायदा हा गरिबासाठी किंवा श्रीमंत साठी वेगळा नसतो.. तो सर्वांसाठी समान असतो,भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकार मधील  कलम 14 नुसार सर्वांना समान कायदा आहे, कलम पंधरा नुसार जातीचा भेदभाव करता येणार नाही, कलम 16 नुसार सर्वांना समान शासकीय नोकरीची संधी आहे, कलम 19 नुसार  स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार आहे, कलम 25 नुसार विविधते मध्ये एकता आहे,

पशु चिकित्सक डॉ वासुदेव राठोड याच्या सतर्कतेने सर्पदंश झालेल्या दोन जनावरांचा वाचला जीव

तळणी (रवी पाटील) दी ४ नोव्हेबर दीपावलीच्या दिवशी तळणी येथील दोन शेतकर्याच्या एक गाय व एक बैल याना शेतात असताना सर्पदश  झाला होता पंरतू विदर्भातील डॉ वासुदेव राठोड याच्या समय सुचकते मुळे व योग्य उपचारामुळे दोन्ही जनावाराचे प्राण वाचले ऐन दीवाळीच्या सणातच ही घटना घडली असून डॉक्टरानी ताबडतोब उपचार करून दोनही गरीब शेतकर्याचे पशुधनाला जीवनदान  दील्याने त्याचे कौतूक होत आहे शक्यतो वर सर्पदशं झालेल्या जनावाराची वाचण्याची शक्यता कमी असते काही सर्पदशं झाल्यावर सुरवातीचा काही काळ हा खूप कठीण असतो पंरतू योग्य व तात्काळ उपचार केल्यास पशुधनास जीवनदान मिळते असे डॉ राठोड यानी सांगीतले आधीच निसर्गाच्या लहरी पणा चा फटका शेतकर्याना बसला असुन  शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असुन तो अडचणीत होता

मंठा येथील न्यु इंग्लिश स्कुल अँन्ड ज्युनिअर काँलेज मंठा येथे दिपावली निमित्त स्नेह संमेलन संपन्न

  मंठा (सुभाष वायाळ)दि.11मागील एक ते दिड वर्षापासून कोरोना मुळे संपूर्ण शाळा कॉलेज बंद होते. परंतु शासन निर्णयया नुसार पहिली ते बारावी  चे वर्ग  सुरू करण्यात येणार आहेत.हा आनंद व्दिगुणित व्हावा व स्नेह वाढावा या उदेशाने स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले असल्याचे डाँ.बि.बि.प्रधान सरांनी सांगितले.                  कार्यक्रमाचे अध्यक्ष  म्हणून डाँ.बि.बि.प्रधान सर  होते तर प्रमुख पाहुणे  सिराज पठान,बाळासाहेब वांजोळकर,रवि प्रधान सर,कमळकर सर,गायकवाड सर,राहुल प्रधान सर,अरुन प्रधान सर, पप्पु वायाळ,खराबे   होते. मंठा नगरीत पालकांच्या तसेच शिक्षकांच्या सहकार्याने शाळा जोमात सुरू आहे कमी कालावधीत नावारूपाला आलेली संस्था एका मंठा या साररख्या भागात डॉ. बि.बि.प्रधान सर यांनी स्थापन करून शाळेला आधुनिक सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता नावारूपाला आली आहे न्यु इंग्लिश स्कूल स्थापन करून शाळेला आधुनिक सुविधांमुळे तसेच शाळेचे मैदान असो शुद्ध पाणी असो या भागात स्थापन करून ग्रामीण विद्यार्थ्यांना नवीन व्यासपीठ मिळाले. शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा विद्यार्थ्यांचा प्रवेश घेताना सत्कार केला जातो

शॉट सर्किट मुळे तळणि परीसरात उसाला लागली आग

तळणी (रवी पाटील) मंठा तालुक्यातील तळणी येथील शेतकरी गणेशराव कापकर यांच्या शेतातील ऊसाला शॉर्ट सर्कीट मुळे आग लागून दीड ते दोन एकर मधील ऊसाचे मोठे नुकसान झाले शेतातून गेलेल्या विद्युत पूरवठ्याच्या तारा मध्ये घर्षण होऊन ती ठिणगी ऊसाच्या शेतामध्ये पडली कापकर यांच्या शेताजवळच वंसत नगर वस्ती असुन त्या वस्तीतील पंचवीस ते तीस तरूणानी व शेतातील कामगारानी ही आग आटोक्यात आणली नसता इतर शेतातील ऊसाचे सुध्दा मोठे नुकसान झाले असते संबंधीत शेतकर्याचा ऊस हा तोडणीसाठी तयार आहे उस वाहतूकीसाठी त्यानी रस्त्याची डागडूजी सुधा केली दोन दीवसात ऊसाची तोडणी करण्याच्या तयारी चालू होती या आगीमुळे शेतकर्याचे मोठे नुकसान झाले आहे शेतामध्ये लोबंकळणाऱ्या ताराची मोठी समस्या तळणी परिसरातील अनेक शेतकर्याच्या शेतामध्ये ही समस्या आहे महावीतरण कंपनी ने याकडे लक्ष देऊन त्याना व्यवस्थीत करून देण्याची मागणी अनेक दीवसापासुन अनेक शेतकर्यानी केली तरी याकडे दुर्लक्ष होत असल्याने नुकसानीच्या घटनेला शेतकर्याना सामोरे जावे लागत आहे संबंधीत शेतकर्याच्या नुकसानीचा पंचनामा करून मदत मीळाली पाहीजे अशी मागणी शेतकर्यानी केली आ

तळणि येथे रॉका युवक च्या वतीने दिपावली स्नेहमिलन संपन्न

तळणी (रवी पाटील) मंठा तालुक्यातील तळणी येथे दीपावली स्नेहमिलनाचे आयोजन  राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष्य ज्ञानेश्वर माऊली सरकटे याच्या वतीने करण्यात आले होते या स्नेह मिलनात सर्वपक्षीय आजी माजी कार्यकर्त उपस्थीत होते तळणी मध्ये पहिल्यादांच दिवाळी स्नेह मिलन होत असल्याने येणाऱ्या जि प प समितीची पूर्व तयारी म्हणायला हरकत नाही  सघटनात्मक पकड व कार्यकर्त्यचा उत्साह व सपर्क वाढवण्यासाठी याचा उपयोग होत असतो तळणी मध्ये पहिल्यादांच या स्नेहमिलनाचे आयोजन होत असल्याने सर्वपक्षीय नेत्यानी उपस्थीती लावली यामध्ये राजेश राठोड सुरेश जेथलीया कपील आकात भाऊसाहेब काका गोरे लोणार शिवसेना ता अध्यक्ष्य बळीराम मापारी संतोष वरकड युवा उद्योजक शरद पाटील नितीन सरकटे तळणी  सरपंच ऊध्दवराव पवार ज्ञानेश्वर सरकटे  बबनराव गणगे सचिन बोराडे डिगांबर ईक्कर  वैजनाथ बोराडे विष्णूपंत मोरे बाबुसिग महाराज प्रमेश्वर मोरे भगवान देशमूख बालासाहेब मोरे दारासीगं चव्हाण गौतम सदावर्त  आदीची उपस्थीती या स्नेह मिलनासाठी होते  राजकीय टीका टीपणी च्या पलीकडे जाऊन राजकी पुढारी सुध्दा एकञ येऊ शकतात राजकाराणा मधील म

मंठा-परतुर आगारातील एसटी कर्मचार्‍यांच्या संपाने प्रवाशांची गैरसोय ; खाजगी वाहतूकीनी केली आथिँक आडवणुक

 मंठा (सुभाष वायाळ) राज्य परिवहन महामंडळाच्या राज्य भर चालु असलेल्या अनेक दिवसाच्या संपात सोमवार पासुन परतुर -मंठा परिवहन महामंडळ विभागातील कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी सुरु केलेल्या संपाने एसटीच्या बसेसची वाहतूक पुर्णतः ठप्प आहे. परिणामी हजारो प्रवाशांची सणासुदीच्या काळात मोठी हेळसांड होत आहे. सोमवार पासून एसटी बस वाहतूक कोलमडली आहे. त्यामुळेच सणासुदीत हजारो प्रवाशी अक्षरशः हैराण आहेत. आज ना उद्या संप मिटेल, बस वाहतूक सुरु होईल, या अपेक्षापोटी प्रवाशांनी लांब पल्ल्याच्या गाड्यांचा प्रवास टाळला. परंतु, संपकरी व सरकार यांच्यात कोणतीही तडजोड होईनाशी झाली आहे. परिणामी एसटीची चाके जागच्या जागीच ठप्प आहेत. या दरम्यान औरंगाबाद ,मुंबई, पुणे, नागपूर या महानगरांकडील तसेच नगर,अमरावती वगैरे भागातील ये-जा करणारी वाहतूक बंद आहे. प्रवाशांचे हाल सुरु आहेत. खाजगी वाहतूकीने संपाच्या या पार्श्‍वभूमीवर प्रवाशांची मोठी लूट सुरु केली आहे.  ते पुणे, नागपूर, मुंबई वगैरे भागात ये-जा करण्याकरीता आव्वा की सव्वा दर आकारले जात आहेत. त्यातच कहर म्हणजे खाजगी वाहतूकीने डिझेलच्या दरवाढीपाठोपाठ या स

मंठा येथे आगळी-वेगळी भाऊबीज, कोरोना ने मयत झालेल्या शेतकरी कुटुंबासोबत केली साजरी

मंठा-(सुभाष वायाळ).8 मंठा तालुक्यातील कोरोना महामारीत मयत झालेल्या कर्त्या शेतकरी कुटुंबासोबत मा.मंत्री आ.बबणराव लोणीकर साहेब व राहुल भैय्या लोणीकर यांच्या सुचणेनुसार कृषी उत्पन्न बाजार समिती चे उपसभापती राजेश मोरे यांनी आगळीवेगळी भाऊबीज साजरी केली.        कोरोना महामारीने एकंदरीत माणवाची,जगाची व देशाच्या जिवणपद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदलली आहे , मानसांत मानुस राहीला नसतांना या गोष्टीला कृषी उत्पन्न बाजार समिती चे उपसभापती राजेश मोरे अपवाद आहेत त्यांनी मा.मंत्री आ.बबणराव लोणीकर व राहुल भैय्या लोणीकर यांच्या सुचणेनुसार कोरोना महामारीत स्वतः ची तमा न बाळगता शेकडो पेशंटला भेटूण धिर तर दिलाच शिवाय पहील्या कडक लाॅकडाऊण मध्ये त्याच्यासह मित्रपरिवाराने पायी येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूला अन्नदान केले त्यांनी नेहमीच राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व दिले.नुकतीच झालेले रक्षाबंधन कार्यक्रम सूद्धा त्यांनी कोरोना मुळे मयत झालेल्या परीवारासोबत साजरे केले होते जगनराव काकडे मा.उपसरपंच विवेक काकडे, श्यामराव काकडे ,महेशराव काकडे ग्रामपंचायत सदस्य, निवृत्ती सस्ते ज्ञानेश्वरपंत काकडे , आदिनाथराव

देशमुख इंग्लीस स्कूलच्या वतीने दिपावली स्नेह मिलन व पालक मेळावा संपन्न

तळणी (रवी पाटील)दीपावलीचे औचित्य साधून नितीन देशमूख इग्लीश स्कूल  यांच्या वत्तीन एरंडेश्वर येथे पालक मेळावा व दिवाळी  स्नेहमिलनच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते गत दोन वर्षापासुन कोरोना महामारीमूळे या आनंदाच्या उत्सवावर कोरोना  संकटाचे सावट असल्याने सण उत्सवावर निर्बध आले होते पंरतू यावर्षी निर्बधमूक्त दीपावली साजरी होत असल्याने या स्नेहमिलन व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याने सुरज  देशमुख यानी सांगीतले या मेळाव्यात संस्थेची पूढील वाटचाल शैक्षणीक धोरंण व विद्यार्थाच्या बौध्दीक विकास करून गुंणवंत विद्यार्थी घडवण्यासाठी संस्था प्रयत्त्न शील असणार आहे ग्रामीण भागात इंग्रजी  शीक्षणाची आवड निर्माण व्हावी  ग्रामीण भागातील विद्यार्थाना इंग्रजीबरोबर इतर भाषाचे परिपूर्ण ज्ञानार्जन होणे गरजेचे आहे दोन वर्षाच्या कठीण काळात ग्रामीण भागातील शैक्षणिक व्यवस्था मोडकळीस आली होती ती पूनरजीवीत करण्याचे आवाहन सस्थेसमोर असल्याने त्या पध्दतीचे नियोजन संस्था मार्फत येणाऱ्या काळात राबवले जाणार आहे  पालक मेळावा दीपावली स्नेहमिलन नितीन देशमुख इंग्लिश स्कूल व माध्यमिक विद्यालय एरंडेश्वर ता मंठा  

सासखेडा दूधा येथी टेनीस बॉल क्रिकेट सामन्याचे उद्घाटन संपन्न

तळणी (रवी पाटील)   सासखेडा दुधा येथील शिवशक्ती क्रिकेट क्लब यांच्या वतीने टेनिस बाँल वरील क्रिकेटचे खुल्या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धचे उदघाटन युवा ऊद्योजक शरद पाटील व मंठा नगरीची माजी नगराध्यक्ष्य  नितिन  राठोड याच्या हस्ते करण्यात आले ग्रामीण भागातील खेळाडूना अशा स्पर्धच्या माध्यमातून आपली गुणवता सिध्द करण्यासाठी अशा स्पर्धचे आयोजन करणे गरजेचे असल्याचे मत युवा उद्योजक शरद पाटील यानी व्यक्त केले ग्रामीण भागातील खेळाडूना शारीरीक व्यवस्था निट ठेवण्यासाठी मैदानी खेळाची आवश्यकता असली तरी त्या साठी यञणा व मैदान असणे गरजेचे आहे शहराच्या ठिकाण च्या व्यवस्था जर ग्रामीण भागात उपलब्ध झाल्या तर ग्रामीण भागातील विविध प्रकारच्या खेळातील खेळाडूना गुणवत्ता असलेले खेळाडू आपली गुणवत्ता सिद्ध करू शकतील असे मत यावेळी पाटील यानी व्यक्त केले  यावेळी नितीन राठोड यानी सुध्दा आपले मत व्यक्त केले ग्रामीण भागातील खेळाडूंना मैदानी खेळासाठी प्रोत्साहीत करणे गरजेचे असल्याचे मत राठोड यानी व्यक्त केले या स्पर्धचे आयोजक दुधासासखेडा चे सरपच अजय जाधव ऊपसरंपचअरूण जाधव सतिश खूळे ल