Posts

Showing posts from October, 2020

भाजयुमोचे प्रदेश महामंत्री लोणिकर यांचे बागेश्वरी साखर कारखाना चेअरमन यांना निवेदन

Image
परतूर(प्रतिनिधी) परतूर व मंठा तालुक्यात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या पैशावर उभा राहणाऱ्या या कारखान्याने सर्वप्रथम परतूर व मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस प्राधान्याने संकलित करणे आवश्यक आहे परंतु असे न करता कारखान्याकडून कार्यक्षेत्र बाहेरचा ऊस नोंदणी करून संकलित करण्याचा कुटील डाव आखला जात आहे ही बाब अत्यंत गंभीर असून जोपर्यंत कार्यक्षेत्रातील ऊस पूर्णपणे संकलित केला जात नाही तोपर्यंत कार्यक्षेत्र बाहेरचा ऊस आणू देणार नाही अशी आक्रमक भूमिका भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी घेतली. *लोणीकर यांच्या या आक्रमक  भूमिकेसमोर कारखाना प्रशासन झुकले असुन कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊस संकलित केल्याशिवाय बाहेरचा ऊस आणणार नाही अशा शब्दात कारखाना व्यवस्थापनाने लोणीकर यांच्यासह उपस्थित शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला शब्द दिला. माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वात आज परतूर व मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांनी कारखाना व्यवस्थापनाची भेट घेऊन आक्रमकपणे शे

आरक्षण उपसमितीची जबाबदारी खा. छत्रपती संभाजीराजे आणि मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्याकडे सोपवा, भाजपा जालना तालुका सरचिटणीस प्रा. सहदेव मोरे पाटील यांची मागणी

Image
मंठा(प्रतिनिधी ) काल मराठा आरक्षण  प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी दरम्यान यावेळी देखील मराठा समाजाच्या पदरी निराशाच पडली असून न्यायमूर्ती नागेश्वरराव यांच्या खंडपीठानं मराठा आरक्षणावरील सुनावणी चार आठवड्यांसाठी पुढे ढकलली. तत्पूर्वी महाराष्ट्रातील विद्यमान राज्य सरकारचे वकील उपस्थित न राहिल्यानं सुनावणी स्थगित करावी लागली होती. मराठा आरक्षणासारख्या अति संवेदनशील विषयावर राज्य सरकार किती गंभीर आहे याची प्रचिती काल सुनावणी दरम्यान सकल मराठा समाजाला आली असून मराठा समाजाला आरक्षण देण्याची महाराष्ट्र सरकारची इच्छा दिसून येत नाही त्यासाठी मराठा आरक्षण उपसमितीची जबाबदारी खा. छत्रपती संभाजीराजे आणि मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्याकडे सोपवण्यात यावी अशी मागणी भाजपा जालना तालुका सरचिटणीस प्रा. सहदेव मोरे पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.  राज्य सरकारच्या या हलगर्जीपणावर मराठा समाजाने समाज माध्यमांवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून  'सुप्रीम कोर्टात सरकारचे वकील मराठा आरक्षणासारख्या अतिसंवेदन सुनावणीला उपस्थित राहत नाहीत आणि त्यावर कळस म्हणजे आरक्षणासाठी स्थ

भारतातील सर्वात स्वस्त पाणीपुरवठा करणारी योजना, 1 पैशात 1 लिटर तर 12 रुपयात 1 हजार लिटर पाणी मिळणारा देशातील एकमेव प्रकल्प-माजी मंत्री आ.लोणिकर

Image
परतूर, मंठा व जालना तालुक्यातील 176 गावे व मंठा तालुक्यातील स्वतंत्र 95 गावांच्या दोन ग्रीड पाणी पुरवठा योजना ह्या महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाकांक्षी योजना असून तिन्ही तालुक्यातील 110 गावात शुद्ध पाणीपुरवठा आज तारखेला सुरू आहे. या योजनेच्या माध्यमातून तीन तालुक्यांना पिण्याचा शुद्ध पाणीपुरवठा होणार आहे. 1 पैशात 1 लिटर तर 12 रुपयात 1000 लिटर शुद्ध पाणी मिळणार आहे. या दोन्ही योजनेसाठी एकूण 400 कोटी रु. खर्च केले जाणार आहेत. भारतातील सर्वात स्वस्त पाणी पुरवठा करणारी योजना असणार आहे अनेक ठिकाणी ग्रीडचे काम पूर्ण झाले असून छोट्या मोठे कामे करणे प्रलंबित आहेत. ही कामे तात्काळ पूर्ण करून पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करावी अशा सूचना माजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी आज दिल्या. औरंगाबाद येथे आयोजित मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या कार्यालयात आयोजित बैठकीत माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर बोलत होते यावेळी मुख्य अभियंता लोलापोड, अधीक्षक अभियंता अजयसिंह, मनोज पांगारकर, ॲड. वीरेंद्र देशमुख, कार्यकारी अभिय

परतूर पोलीस ठाणे येथे आयपिएस गोहर हुसेन रूजू

Image
  परतुर (प्रतिनिधी) परतुर तालूका अंतर्गत येणारे परतूर पोलीस स्टेशन येथे  दिनांक 26 सोमवार रोजी ट्रेंनीग साठी आय पी एस गौहर हसन यांनी आज परतूर पोलीस स्टेशन येथे पदभार घेतला आहे   असून शहरातील राजकिय पूढारी,पत्रकार,शांतता कमिट चे सदस्य,पत्रकार , नागरिकांनी त्यांचा सत्कार केला ते मुळ बिहार येथील रहवासी आहे गोहर हसन यांनी  सांगितले  की या पुढे गुन्हेगारांवर वचक निर्माण करून त्यांना शिस्त लावन्याचे काम करणार   असल्याची माहिती पोलिस अधीक्षक यांनी  दिली शहरातले नागरिक साठी कोरोना चा प्रदूर्भाव संपलेला नसल्याचे  त्यांनी सांगितले  . परतुर शहरातील नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियामचे पालन करावे सोशल डिस्टनसिंग आणि मास्क चा वापर करावा कोरोना हां पूर्ण पने संपलेला नाही असी माहिती दिली      

मराठवाडा मंडळातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या पदोन्नती बाबत होत असलेल्या अन्यायाविरोधात सामूहिक रजा आंदोलन

Image
परतूर प्रतिनिधी  मराठवाडा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या पदोन्नती, कालबध्द पदोन्नती व इतर बाबतीत विभागीय व शासन स्तरावरून होत असलेल्या अन्यायाबाबत परतुर तालुका महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने 28 व 29 ऑक्टोबर रोजी सामूहिक रजा आंदोलन करण्यात येणार आहे. या संदर्भात परतूरच्या तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की औरंगाबाद विभागात रखडलेल्या पदोन्नत्या बाबत व प्रलंबित विभागीय चौकशी, फौजदारी खटल्यातील अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारकून, मंडळाधिकारी, महसूल सहाय्यक तलाठी वाहन चालक शिपाई कोतवाल कर्मचारी यांच्या बाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत वेळोवेळी निवेदन देऊनही मागण्याबाबत शासनाने कोणतीही चर्चा न केल्यामुळे व मंजूर न केल्यामुळे विभागीय अध्यक्ष मराठवाडा महसूल कर्मचारी संघटना औरंगाबाद यांनी पुकारलेल्या 28 व 29 ऑक्‍टोबरच्या दोन दिवसीय सामूहिक रजा आंदोलनाला परतूर महसूल कर्मचारी संघटनेचे अधिकारी व कर्मचारी पाठिंबा देणार आहेत. तहसीलदारांना देण्यात आलेल्या नियोजनावर एस.जी. पवार, ए.जी. शिंगाडे, व्ही.यु. पुरी, अब्दुल बा

संगायो इंगायोत उत्ककृष्ट काम केल्या बद्ल परतूर येथील अधिकारी,कर्मचारी यांचा सत्कार संपन्न

Image
संगायो इंगायो या योजने अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान लोकनेते माजी मंत्री आमदार बबनरावजी  लोणीकर .यांच्याहस्ते करण्यात आला या मधे परतूर  च्या तहसीलदार श्रीमती रूपा चित्रक . गट विकास अधिकारी गुंजकर साहेब सह संजय गांधी विभागातील नायब तहसीलदार  श्रीमती एम .एम .मोरे. ए.बी देशपांडे. एस. सरकटे मॅडम. प्रमोद कुलथे. यांच्यासह  संजय गांधी वीभागातील सर्व  कर्मचाऱ्यांचा सत्कार  एका कार्यक्रमात करण्यात आला. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लवकर स्वास्थ लाभावे या करीता देवीला होम हावन करून साकडे

Image
घनसांवगि(प्रतीनिधी)महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते मा.देवेन्द्रजी फडणवीस साहेब यांना कोरोनाची लागण झाली असल्यामुळे त्यांनी कोरोनवर लवक रात लवकर मात करून जनतेच्या सेवेसाठी व शेतकऱ्यांच्या मदतीसाठी लवकर बरे व्हावे यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने देवी दहेगाव  येथील रेणुका देवी संस्थान येथे होम हवन करून साकडे घालण्यात आले यावेळी उपस्थित भाजपा अ.जा. मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सर्जेराव दादा जाधव,भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अंकुशराव बोबडे,किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव पांढरे,भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष योगेश ढोणे,भाजप अ.जा.मोर्चा तालुकाध्यक्ष रामदास भालेराव,युवा मोर्चा जिल्हा चिटणीस रामेश्वर सोळंके,भाजपा प्रसिध्दी प्रमुख रामेश्वर गरड,अ.जा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ पाटोळे,अ.जा.मोर्चा जिल्हा सरचिटणीस किरण गुढेकर,अ.जा मोर्चा अंबड तालुकाध्यक्ष सुहास साबळे, अ.जा मोर्चा जाफराबाद ता.अध्यक्ष प्रदीप जाधव,प्रसिध्दी प्रमुख सुनील शेंडगे,भाऊसाहेब देवडे,जगन्नाथ मुळे,अमोल काळे,संदीप काळे,डीगांबर धांडे,बूथवेल लालझरे,सुनील गुढेकर,विजय साबळ

मतदारसंघाचा कायापालट करणे ही आमची जबाबदारी,मतदार संघातील जनतेने आपल्याला भरभरून प्रेम दिले - प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर

Image
परतूर (प्रतिनिधी) गेल्या पाच सहा वर्षांमध्ये परतूर मतदार संघाचा माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकास झाला असल्याचे प्रतिपादन भाजयुमोचे प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर यांनी केले         ते परतूर तालुक्यातील कोकाटे हादगाव ,कोकाटे हदगाव तांडा, व हातडी तालुका परतुर येथे युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण व उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते       पुढे बोलताना राहुल लोणीकर म्हणाले की आपल्यावर भारतीय जनता युवा मोर्चा ने राज्याची जिम्मेदारी टाकली असून आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विविध माध्यमातून जनतेची सेवा करणार असल्याचे ते म्हणाले.  मतदारसंघातील जनतेने आपल्याला भरभरून दिले असून आपण मतदार संघाचे पांग फेडल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास त्यांनी या वेळी बोलून दाखवला  विकासाच्या कामांमध्ये आणि समाजाच्या हिताच्या आड येणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या विरोधात आपण ठाम असल्याचे सांगत येथील युवा व सर्व स्तरातील नागरिक माझे कुटुंब असून माझ्या कुटुंबातील प

जनसेवा हीच ईश्वरसेवा मानणारे देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण. ,आपण लवकर बरे होऊन जनसेवेसाठी पुनश्च वाहून घ्यावे,ही पांडुरंगाकडे प्रार्थना - माजी मंत्री बबनराव लोणीकर

Image
आमचे सर्वांचे लाडके नेते व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना कोविड- 19 ची लागण झाली असून, जनसेवेला ईश्वर सेवा मानणारे  देवेंद्रजी लवकरच या आजारातून सुखरूप पने बाहेर येऊन पुनश्च जनसेवेला वाहून घेतील असे साकडे आपण पांडुरंगाकडे घातले असल्याचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी म्हंटले आहे.   कोरोना संकटात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता देवेंद्रजीनी जनतेला या संकट काळा मध्ये चांगले उपचार मिळावेत म्हणून राज्यभरातील अनेक कोविड सेंटर ला भेटी दिल्या तेथील रुग्णांची आस्थेने चौकशी करीत धिर दिला. सुविधा मध्ये चाल ढकल होत असल्याचे सरकार च्या लक्षत आणून देत ठिकठिकाणी बैठका घेत जनतेवर आलेल्या या संकटात खंबीरपणे उभे राहून सामना केला मुंबई असेल पुणे असेल की आपलं औरंगाबाद महानगर असेल स्वतः कोविड सेंटर ला भेटी देऊन योग्य उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या अश्या असामान्य कर्तृत्ववान नेत्याला कोरोना ची लागण झाली असून लवकरच ते या संकटातून सुखरूप बाहेर येतील असा विश्वास लोणीकर यांनी व्यक्त केला आहे.      कोकणात चक्रीवादळ झाले, विदर्भात ढगफुटी झाल

मराठवाडा जनसंपर्क अधिकारी पदी अभिजित कोदंडे यांची नियुक्ती,मानवाधिकार सुरक्षा संघ जालना जिल्हाध्यक्षपदी धनंजय पोहेकर*,जालना जिल्हा मीडिया प्रभारी पदी सौ.मंजुषा काळे*,बदनापूर तालुकाध्यक्षपदी बिभीषण नन्नवरे

Image
प्रतिनिधी  मानवाधिकार सुरक्षा संघ महाराष्ट्र अध्यक्ष दिलीपजी कंखर, उपाध्यक्ष गणेशजी डवरी,महासचिव गजानन इंगळे यांच्या सल्ल्याने  सचिव दिपेश पष्टे,सहसचिव गजेंद्र भिसे,  महाराष्ट्र प्रमुख अरुण पांडव आणि  महामंत्री अँड.राजू कासार, मराठवाडा अध्यक्ष अनिलजी  खंदारे  यांच्या मार्गदर्शनाने   मानवाधिकार सुरक्षा संघ मराठवाडा जनसंपर्क अधिकारी पदी अभिजीत कोदंडे यांची नियुक्ती करण्यात आली तसेच जालना जिल्हा मानवाधिकार सुरक्षा संघ जालना जिल्हाध्यक्षपदी धनंजय पोहेकर,   मीडिया प्रभारी पदी सौ.मंजुषा काळे व बदनापूर तालुकाध्यक्षपदी बिभीषण नन्नवरे यांची नियुक्ती करण्यात आली.  या निवडी बद्दल परतूर, मंठा, बदनापूर  व जालना च्या वतीने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले.  नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी मानवाधिकार सुरक्षा संघ महाराष्ट्र सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देत आभार व्यक्त केले.

परतुर शहरातील तहसिल कार्यालय ते काँलेज रोड दुरूस्ती, पाडेवार यांच्या पाठपुरठयाला यश

Image
परतुर (प्रतिनिधी,) जालना जिल्ह्यातील परतुर शहरातील मुख्य रस्ता असलेला तहसिल कार्यालय ते काँलेज रोड वरती मोठ मोठ खड्डे पडले होते या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार यांनी परतुर च्या उपविभाग आधिकारी यांना दिनांक १५ आँक्टोबर रोजी लेखी निवेदन देऊन हा रस्ता तात्काळ दुरूस्ती करण्या यावा असी मागणी केली होती, रस्त्यावर मोठ मोठे खडे पडले असुन अनेक वाहणे या खड्यात फसत असल्याचे निवेदनात नमूद केले होते , या निवेदनाची  तात्काळ उपविभागीय अधिकारी, यांनी दखल घेऊन नगरपालिकेला दिनांक १६ आँक्टोबर रोजी पञ देऊन हा रस्ता तात्काळ दुरूस्ती करण्या संदर्भात लेखी कळवले होते,तसेच पाडेवार यांनी  माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांना सुध्दा या रस्त्या संदर्भात माहिती दिली होती, लोनिकर यांनी पाडेवार यांच्या मागणीची तात्काळ दखल घेत नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना मोबाईलवर संपर्क करून हा रस्ता तात्काळ दुरूस्ती करून नविन पक्का रस्ता बनवण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना केल्या, हा रस्ता तात्काळ दुरूस्ती करण्यात येईल अशे मुख्याधिकारी यांनी लोणीकर यांना सांगितले गुरुवारच्या मध्ये राञी मेघा

पशू वैद्यकिय वीभागाच्या सतर्कते मुळे125 जनावारांचे प्राण वाचले

Image
परतूर दि.23(प्रतीनिधी) पशु वैद्यकीय विभागाच्या सातर्कते मुळे वाचले 125 च्या वर जनावरांचे प्राण.     परतूर तालुक्यातील नांद्रा या गावात अचानक  सायंकाळी पाच वाजल्या  च्या सुमारास  जनावरांनी काही खाल्याने जनावरे दगवण्यास सुरवात झाली होती. या दरम्यान गावातील 3 ते 4 जनावरे दगावली गेली याची माहिती या गणाचे पंचायत समिती सदस्या वंदनाताई दिगंबर मुझमुळे यांनी पशु वैद्यकीय तालुका अधिकारी डॉ रमाकांत ढवळे यांना दूरध्वनी द्वारे काळवताच अवघ्या काही तासात  डॉ प्रशांत रोहनकर,डॉ. जाधव, कर्मचारी गोरे यांना घेत तात्काळ नांद्रा या गावी दाखल होत. गावातील सर्व जनावरांची पाहणी करत उपचार चालू केला या मुळे जवळपास 125 जनावरांचे प्राण वाचले या बद्दल सर्व ग्रामस्थांनी सर्व पशु विभागाचे आभार मानले. या वेळी माझी सरपंच तथा पं.स.सदस्य दिगंबर मुजमुले, प्रभू ताठे, मदन मुजमुले, दीपक मुजमुले, गजानन मुजमुले,रंगनाथ हिवाळे, कोंडीभाऊ तांगडे, विष्णू मुजमुले, सुनील आखाडे,सुभाष आखाडे .राजेभाऊ भेंडाळकर,मोहन पारे, शिवाजी भेंडाळकर, विठ्ठल आखाडे, विष्णू मुजमुले, मनोहर मुजमुले आदिनी मदत केली

शिक्षण समितीला विचारात न घेताच शिक्षणअधिकार्यानी परस्पर चौकशी केल्याचा आरोप

तळणि (प्रतीनिधी) तळणी येथील जि प प्रशालेचे मुख्याध्यापक एल डी चव्हाण यांची चौकशी करण्यासाठी शिक्षण अधिकारी के दातखीळ व ऊपशिक्षण अधिकारी खरात यानी बुधवारी दुपार नंतर शाळेला भेट देऊन  चौकशी केली असता मुख्याध्यापकाच्या विरोधात तक्रार करणाऱ्या शिक्षण समिती अध्यक्ष व इतर ग्रामस्थ व पालक यांना अंधारात ठेवून शिक्षण अधिकार्यानी चौकशी केल्याचा आरोप अध्यक्ष्य संतोष सरकटे शिवसेना ता उपप्रमुख ज्ञानेश्वर सरकटे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष्य कैलास सरकटे यानी केला आहे गावामधुन जिल्हा अधिकारी व शिक्षण विभागाला संबंधित मुख्याध्यापकावर कारवाई करण्यासाठी बऱ्याच तक्रारी प्राप्त झाल्या आहेत  शिक्षणअधिकार्याच्या भेटीत दोघेच हजर   शाळेत झालेल्या अपहारा प्रकरणी भेट देण्यासाठी आलेल्या शिक्षण अधिकारी कैलास दातखीळ यांना दोघेच हंजर असल्याचे निर्दर्शनास आले असुन चार शिक्षकांना नोटीस देणार असल्याची शिक्षण अधिकारी यानी सांगीतले असुन यामुळे पुन्हा एकदा शाळेचा कारभार चव्हाट्यावर आला या प्रकरणाचा एक अहवाल गट शिक्षण अधिकार्याचा तयार असुन तो चौकशी अहवाल कारवाई करण्यास पूरेसा असेल तर त्या अहवालावरच कारवाई करण्यात येणार

धर्माबाद ते मनमाड एक्स्प्रेस शनिवारी सकाळपासून धावणार..

Image
परभणी, दि. 22 (प्रतिनिधी) ः काचिगुडा ते मनमाड या रेल्वेमार्गावर शनिवारपासून (दि.24) धर्माबाद - मनमाड - धर्माबाद ही विशेष एक्स्प्रेस धावणार आहे. दरम्यान, यापूर्वी याच वेळेत मराठवाडा एक्स्प्रेस धावत होती. त्याच वेळेत विशेष रेल्वे म्हणून ही रेल्वे धावणार आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वे विभागाने नांदे़ड ते पनवेल या एक्स्प्रेस पाठोपाठ मराठवाड्यातील रेल्वेप्रवाशांच्या सोयीकरिता धर्माबाद ते मनमाड व मनमाड ते धर्माबाद ही विशेष रेल्वे शनिवारपासून सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ही रेल्वे धर्माबादहून सकाळी चार वाजता निघणार आहे. नांदेड स्थानकावर पाच वाजून 28 मिनिटांनी, पूर्णेत सहा वाजून तीन मिनिटांनी, परभणीत सहा वाजून 38 मिनिटे, मानवतरोड सहा वाजून 57 मिनिटे, सेलूत सात वाजून 17 मिनिटे, परतूर सात वाजून 44 मिनिटे, रांजनी सात वाजून 54 मिनिटे, जालना आठ वाजून 28 मिनिटे, बदनापूर आठ वाजून 49 मिनिटे, मुकूंदवाडी 9 वाजून 29 मिनिटे, औरंगाबाद येथे दहा वाजून पाच मिनिटांनी, लासूर येथे दहा वाजून 41 मिनिटे, करंजगाव दहा वाजून 54 मिनिटे, रोटेगाव 11 वाजून 19 मिनिटे, अंकई 12 वाजून 52

परतूर पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी शेषराव वायाळ ,सचिव सुरेश कवडे तर कार्याध्यक्ष पदी अर्जुन पाडेवारयाची बिनविरोधी निवड,

Image
परतूर /प्रतिनिधी परतूर पत्रकार संघाची गुरुवार ता.22 रोजी येथील शासकीय विश्रांम गृहात मावळते अध्यक्ष शामसुंदर चितोडा व योगेश बरीदे याच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली यावेळी मागिल कार्यकारणी संपुष्टात आणून नूतन  कार्यकारणी घोषित करण्यात आली. यामधे  अध्यक्ष पदी शेषराव वायाळ, सचिव सुरेश कवडे कार्याध्यक्ष पदी अर्जुन पाडेवार याची  बिनविरोध निवड करण्यात आली. त्याचबरोबर प्रवक्ते पदी कैलासराव सोळके, उपाध्यक्ष पदी  संतोष अखाडे,संजय देशमाने,सहसचिव माणिक जैस्वाल,कोषाअध्यक्ष सरफराज नाईकवाडी, सह कोषाध्यक्ष सय्यद तय्यब ,याची निवड करण्यात आले.यावेळी पत्रकार सय्यद वाजेद, मनीष अग्रवाल,इम्रान कुरेशी, सुरेश शिंदे, कैलास चव्हाण,शेख असेफ,प्रभाकर प्रधान,राजकुमार भारूका,राहुल मुज़मुले, शिवकुमार भारूका,माजेद ,तारेक,शाम सोनी,अजय कांबळे,सु.द.शिवनगिरीकर,शे.अथर,मोईन पाशा ,पांडूरंग शेजूळ कृष्णा धोंगडे आदीची उपस्थिती होती.....
Image
घनसांवगि (प्रतीनिधी)       आज दि 21 बुधवार रोजी जालना जिल्ह्यातील घनसांवगि तालूक्यातील लींबी येथील रहीवाशि होते त्याचे अंदाजे वय 65 वर्ष होते त्यांचे दिर्घ आजाराने आज पाहाटे.निधन झाले         ते जनसंघ ते भाजप आसा त्यांचा प्रवास होते ते युवामोर्चा जिल्हाध्यक्ष,भाजप चे तालूका सरचिटणिस,भाजपा जिल्हाध्यक्ष ते काही काळ परीवाहन मंडळाचे संचालक सुध्दा होते त्यांच्या जाण्याने जिल्हाभाजपात मोठ पोकळी निर्माण झाली आहे कठीण प्रसंगात मार्गदर्शन करणारा आणि पाठीशी खंबीरपणे उभा राहणारे व्यक्तिमत्व म्हणजे दिलीप काका तौर. राजकारणात असो ही कौटुंबिक बाबीत असो दिलीप काका यांचे मार्गदर्शन मला नेहमीच मार्गदर्शक ठरले आहे पक्षात काम करत असताना पक्षाची शिस्त कशा पद्धतीने काम करावं या सर्व बाबतीत दिलीप काकांचं मार्गदर्शन आम्हाला वारंवार मिळालो कधी समजून सांगून तर कधी रागावून एखादी गोष्ट आमच्याकडून करून घेण्याची पद्धत ती उणीव आम्हाला नक्कीच जाणवेल. व्यक्तिशः माझ्याकडून व माझ्या मोरे पाटील परिवाराकडून दिलीप काका यांना भावपूर्ण श्रद्धांजली. तौर कुटुंबीयांना हे संकट पेलण्याची ताकद ईश्वर देवो ही प्रार्थना

नवराञातच परतुरात वीज पाण्याचे वांदे..? 8 दिवसापासून निर्जळी; परतूर पालिकेचा भोंगळ कारभार

Image
                                                                               परतूर(प्रतिनिधी) शहरामध्ये गेल्या 8-10 दिवसापासून नगरपालिका व वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार चालला असून हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचे असलेला नवरात्र दरम्यान गेल्या आठ ते दहा दिवसापासून परतूर शहरामध्ये मोंढाभागातील अनेक काॅलनीत दुरूस्तीच्या नावाखाली पुर्वकल्पना न देता व पर्यायी व्यवस्था न करता पालिकेने ऐन नवराञातच शहराचा पाणीपुरवठा बंद केल्यामुळे नागरिकात व महिला वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.तसेच पालिकेच्या कुपनलिका बंद व नादुरुस्त असल्याने तसेच,टँकरने सुध्दा पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक वैतागले आहेत,पालिकेने पाणीपुरवठा संदर्भात पर्यायी व्यवस्था करणे अपेक्षित होते पण पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे ते सुध्दा करणे झाले नाही यामुळे शहरातील नागरिकांचे अक्षरशः हाल होत आहेत.अगोदरच कोरोना महामारीची भीतीचा प्रकोप त्यात हिंदू सणांमध्ये घरातील साफसफाई यासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी नागरिकांना व महिलांना नवराञाचा नऊ दिवसाचा उपवास असुन सुध्दा गल्लोगल्ली भांडे घेऊन पाण्याच्या शोधात फिरावे लागत

दिलीप काका तौर यांच्या निधनाने जालना जिल्हा भाजपात भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली- भाजयुमो प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर

Image
घनसाांवगि (प्रतीनिधी) दिलीप काका तौर यांच्या निधनाने जालना जिल्हा भाजपा मध्ये प्रचंड मोठी पोकळी निर्माण झाली असून ती पोकळी केव्हाही भरून निघणार नाही दिलीप काका च्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना अनेक मार्गदर्शक सूचना त्यांच्याकडून लागल्या राजकीय क्षेत्रात काम करताना त्या सूचना वेळोवेळी कामी पडल्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती ते भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष एस टी महामंडळाचे संचालक यासारख्या अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या दिलीप काकांनी पार पडल्या भारतीय जनता पार्टीचे जिल्हा कार्यालय उभारण्यात दिलीप काका यांचा मोलाचा वाटा होता तौर परिवाराच्या या दुःखद प्रसंगात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा व्यक्तीशः मी  आणि माझे लोणीकर कुटुंबीय सहभागी आहोत हे दुःख पेलण्याची शक्ती दिलीप काकांच्या परिवाराला मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

दिलीपराव तौर यांच्यासारख्या लढवय्या माणूस, एक सच्चा मित्र, स्पष्टवक्ता आणि पक्षासाठी निष्ठेने काम करणारा कार्यकर्ता गमावला- माजीमंत्री बबनराव लोणीकर

Image
घनसांवगि (प्रतीनिधी) दिलीपराव तौर यांच्यासारख्या लढवय्या माणूस, एक सच्चा मित्र, स्पष्टवक्ता आणि पक्षासाठी निष्ठेने काम करणारा कार्यकर्ता गमावला आज आम्ही गमावला आहे. लिंबी तालुका घनसावंगी या छोट्याशा गावातून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात करणारे दिलीपराव भारतीय जनता पार्टीचे पूर्णवेळ कार्यकर्ते, भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे जालना जिल्हाध्यक्ष या पदावर त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती. भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांशी दिलीपरावांची खूप जवळीकता होती युती सरकारच्या काळात परिवहन महामंडळाचे संचालक म्हणून देखील त्यांनी मोठं काम केलं आहे. दिलीपराव तौर हे निडर आणि प्रचंड स्पष्टवक्तेपणा असणारे नेते होते पक्षात असो की पक्षाबाहेर जी बाब पक्षविरोधी असेल त्या बाबीला प्रचंड विरोध करण्याची क्षमता आणि ताकद दिलीपराव यांच्यामध्ये होती, कुशल मार्गदर्शक, दुर्दम्य इच्छाशक्ती, खर्‍याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणण्याची ताकद असणारा मित्र आज आज मी गमावला आहे. दिलीपराव यांचा मुलगा ॲड.गणेश तौर नक्कीच पुढे द

शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार- माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांना मदत न केल्यास विधानसभा आणि विधान परिषदेचे कामकाज चालू देणार नाही- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर

Image
मंठा(प्रतिनिधी) महाराष्ट्रातील सरकार शेतकऱ्यांच्या नावावर सत्तेवर आलं परंतु सत्तेवर आल्यानंतर मात्र सरकारला शेतकऱ्यांसह सर्वच बाबींचा विसर पडला असून आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर आहोत जोपर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळत नाही तोपर्यंत मी प्रयत्न करत राहील आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईल असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केले मंठा तालुक्यातील कर्नावळ, रानमळा याठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस बोलत होते यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर माजी मंत्री पंकजाताई मुंडे माजी मंत्री आमदार संभाजी निलंगेकर भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश प्रभारी संजय कोडगे भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस राहुल भैया लोणीकर युवा मोर्चा सचिव प्रेरणा होनराव यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की सरकारला सत्तेत आल्यानंतर आपण स्वतः दिलेल्या शब्दांची तरी किमान आठवण राहणे अपेक्षित होते परंतु आज या शब्दाला सुद्धा सरकार जागत नाही ह

मुख्याध्यापकाची चौकशी गुलदस्त्यात जिल्हाधिकार्याचे शिक्षण विभागाला चौकशीचे पञ , शिक्षण समीती सह ग्रामस्थ करणार उपोषण

तळणी : तळणी ता मंठा येथील जि प प्रशालेचे मुख्याध्यापक एल डी चव्हाण यांनी भ्रष्ट्राचार केल्या प्रकरणी  त्याची चौकशी करण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन जिल्हाधिकर्याना शिक्षण समिती अध्यक्ष्याच्या वतीने देण्यात आले होते तळणी या शाळेमधील मुंलांच्या पोषण आहारामधील अनियमीतत्ता बांधकामामधील गैरव्यवहार गणवेश वाटप इत्यादी प्रकरणाची चौकशी करण्याचे पञ जिल्हा शिक्षणाधिकारी  शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद जालना याना दिले असले तरी या प्रकरणाची कुठलीच चौकशी होत नसल्याने शिक्षण समिती व ग्रामस्थ दसरा झाल्यानंतर उपोषण करणार आहेत  शेकडो विद्यार्थी वंचीत  गेल्या पंधरा ते विस दिवसापासून चालू असलेल्या या वादामुळे शाळेमध्ये विद्यार्थाचा पोषण आहार तसाच पडून असुन शेकडो विद्यार्थी या पोषण आहारापासुन वंचित असुन त्या पोषण आहाराची गुणवत्ता खराब होण्याची भिती आहे हे या आधी सुध्दा मुख्याध्यापक एल डी चव्हाण याच्या विरोधात ग्रामस्थानी अनेक वेळा तक्रारी करुन सुध्दा शिक्षण विभागाने त्याच्या विरोधात कुठलीच कारवाई केली नाही शिक्षण समिती अध्यक्ष संतोष सरकटे यानी एक महिन्यापूर्वी निवेदन देऊन सुध्दा या प्रकरणाची चौकशी होत

पीक कापणी करूनच आणेवारी काढा नजर आणेवारी कालबाह्य- माजी मंत्री आ. लोणिकर

Image
 मंठा ( प्रतिनिधी ) वॉटर ग्रीड ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असून योजना चालवण्याची जबाबदारी त्या त्या ग्रामपंचायत ची आहे त्यासाठी गावाच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे मत माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले मराठवाड्यातील पाणी पातळी मध्ये मोठी घट झाल्यामुळे  गेल्या चार-पाच वर्ष मराठवाड्याला 4000 टँकर द्वारे पाणीपुरवठा केला जात होता या पार्श्वभूमीवर आपण मंत्री असताना परतूर मंठा विधानसभा मतदारसंघासाठी फिल्टर पाणी उपलब्ध करून देण्या साठी  परतूर विधान सभा मतदार संघासाठी मापेगाव व वांजोळा येथे वॉटर ग्रीड योजना मंजूर केली  त्यातील मापेगावच्या योजनेचे (176 गावे) पाणी मतदारसंघातील अनेक गावापर्यंत पोहोचले  असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले मंठा येथील तहसील कार्यालयामध्ये आमदार बबनराव लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली वॉटर ग्रीड योजना व वृक्ष लागवडी संदर्भात आढावा बैठक संपन्न झाली याप्रसंगी ते बोलत होते यावेळी तहसीलदार सुमन मोरे जालना तहसीलदार श्रीकांत भुजबळ गट विकास

वाटर ग्रिड,वृक्ष लागवडीत ग्रामपंतायतीने लक्ष घालावे -आ.लोणिकर

Image
 परतूर ( प्रतिनिधी ) मराठवाड्यातील पाणी पातळी मध्ये मोठी घट झाल्यामुळे  गेल्या चार-पाच वर्ष मराठवाड्याला 4000 टँकर द्वारे पाणीपुरवठा केला जात होता या पार्श्वभूमीवर आपण मंत्री असताना परतूर मंठा विधानसभा मतदारसंघासाठी फिल्टर पाणी उपलब्ध करून देण्या साठी  परतूर विधान सभा मतदार संघा साठी वॉटर ग्रीड योजना मंजूर केली  आज या योजनेचे पाणी मतदारसंघातील 100  गावा पर्यंत पोहोचले  असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले              परतूर येथील तहसील कार्यालयामध्ये आमदार बबनराव लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली वॉटर ग्रीड योजना व वृक्ष लागवडी संदर्भात आढावा बैठक संपन्न झाली याप्रसंगी ते बोलत होते  पुढे बोलताना ते म्हणाले की मतदारसंघात राबवण्यात आलेल्या वाटर फिल्टर पाणी 12 रुपये 30 पैशांमध्ये 1000 लिटर मिळत असल्याने ग्रामस्थांना हे पाणी अतिशय स्वस्त पडत असून सरपंच ग्रामसेवक यांनी पुढाकार घेत या योजनेचा लाभ माफक दरामध्ये होत असल्याने करून घ्यावा असे सांगितले पुढे ते म्हणाले की सदरील योजनेचे वीज बिल, केमिकल, व मेंटेनन्स साठी येणारा खर्च ग्रामपंचायतींनी पाणीपट्टी द्वारे द्यावयाच

युवा मोर्चा पुढे सरकार नमले, लवकरच जिम सूरू होणार- राहुल लोणिकर

Image
परतूर (प्रतिनिधी) राज्यसरकार युवा मोर्च्या च्या दबावाला झुकले असून लवकरच जिम आणि व्यायामशाळा सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे    या संदर्भात राज्याचे भाजयुमो प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील भाजयुमो प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर यांच्या सह प्रमुख पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटली होती यावेळी या शिष्टमंडळाने युवकांसाठी व्यायाम शाळा सुरू कराव्यात असी मागणी केलं होती या संदर्भात युवा मोर्चा ने आक्रमक भूमिका घेत आंदोलन करण्याचा इशारा देताच सरकार नरमले असून लवकरच राज्यातील जिम व व्यायामशाळा सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.      या संदर्भात भा ज यु मो प्रदेश सरचिटणीस  राहुल लोणीकर यांनी लवकरच जिम आणि व्यायामशाळा सुरू होणार असल्याचे सांगतानाच राज्याचे सरकार अखेर युववर्गा च्या प्रश्नावर झुकले असल्याचे राहुल लोणीकर यांनी म्हंटले आहे         राज्यात दारू ची दुकाने सुरू झाली मात्र मंदिरे, व्यायामशाळा बंद होत्या त्या मुळे युवा वर्गात मोठी नाराजी होती मात्र सरकार या विषयावर गंभीर नसल्याने युवा मोर्च्या च्या शिष्ट मंडळा

परतूर येथे महाराजा अग्रसेन यांची जयंती साधेपणाने साजरी -

Image
-परतूर/प्रतिनिधी -             येथील नवा मोंढा बालाजी मंदिरात शनिवारी (दि.१७) कोरोना महामारीमुळे महाराजा अग्रसेन यांची ५१४६ वी जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली.सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी गणेशलाल मोहनलाल अग्रवाल (बाबूलतारावाले) यांच्या हस्ते सपत्निक अग्रसेन महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि ध्वजारोहण करण्यात आले.नंतर अग्रसेन महाराजांची आरती करण्यात आली.यावर्षी कोरोनामुळे जयंती मिरवणूक व अन्य सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले होते.शनिवारी मंदिरात झालेले कार्यक्रम कोरोनाचे सर्व नियम पाळून घेण्यात आले.या जयंती कार्यक्रमास अग्रवाल सेवा समितीचे सर्व पदाधिकारी व अग्रवाल समाज बांधवांची उपस्थिती होती.

मराठवाड्यातील ओल्या दुष्काळाबाबत हिवाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारणार, प्रसंगी विधानसभा विधान परिषदेचे कामकाज चालू देणार नाही- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन*=============*सरकार मध्ये आपापसात ताळमेळ नाही, शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे सरकार दळभद्री- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचा घणाघात*=============*परभणीसह मराठवाड्यातील शेती अतिवृष्टीमुळे उध्वस्थ, सरकारने तात्काळ मदत करण्याची आवश्यकता*============ *कृषी सुधारणा विधेयक 2020 मुळे शेतकऱ्यांचा जीवनमान उंचावेल- लोणीकर*

Image
============= परभणि (प्रतीनिधी) परभणी सह  संपूर्ण मराठवाड्यामध्ये 90 टक्केपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले असून मराठवाड्यात पिकांचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे असे असताना देखील इंग्रजांच्या काळातील नजर आणेवारी नुसार 55 टक्के पेक्षा अधिक आणेवारी दाखवून राज्य सरकारला दुष्काळ जाहीर करायचाच नाही की काय असा प्रश्न पडू लागला आहे परंतु येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये मराठवाड्याच्या ओल्या दुष्काळाबाबत सरकारला नक्की जाब विचारू, प्रसंगी देवेंद्रजी फडणवीस चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वात विधानसभा व प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात विधानपरिषदेचे कामकाज भारतीय जनता पार्टीचे शिलेदार चालू देणार नाहीत अशा शब्दात लोणीकर यांनी विद्यमान सरकारचा समाचार घेतला. परभणी येथे पाहिजे शेतकरी संवाद बैठकीदरम्यान माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर बोलत होते यावेळी मंचावर माजी कृषिमंत्री डॉ अनिल बोंडे माजी आमदार विजयराव गव्हाणे माजी आमदार रामदास वडकुते भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ सुभाष कदम  परभणी शहर जिल्हाध्यक्ष आनंदराव भरोसे आमदार मेघना बोर्डीकर युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे भाजपा किसान मोर्चाचे मराठवाडा

युवा मोर्चाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट*,======================*विक्रांत पाटील ,राहुल लोणीकर,शिवानीताई दाणी, आदींचा शिष्टमंडळात समावेश*======================*युवकांचे प्रश्न आणि मराठवाड्यातील परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या झालेल्या प्रचंड नुकसानी बाबत केली चर्चा*=======================

Image
परतूर (प्रतिनिधी) आज दिनांक 16 रोजी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा च्या शिष्टमंडळाने महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन राज्यातील युवकांचे प्रश्न आणि मराठवाड्यातील परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या झालेल्या प्रचंड  नुकसाना संदर्भात चर्चा केली.       या शिष्टमंडळात मध्ये युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील भाजयुमोचे प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर, शिवानी ताई दाणी, सुशील मेंगडे, युवती प्रमुख मीनाताई केदार यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यां चा समावेश होता.     यावेळी राज्यपाल महोदयांना राज्यातील युवकांचे कोरोणा संकटाच्या काळात प्रचंड असे नुकसान झाले अनेक युवा उद्योजक आर्थिक संकटात सापडले, शैक्षणिक क्षेत्रातही विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला या विषयासह मराठवाड्यामध्ये परतीच्या पावसाने अनेक नद्यांना महापुरे आली त्यामध्ये शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून सोयाबीन, मका कापूस,  इत्यादी नगदी पिकासह पपई, केळी ,ऊस द्राक्ष बगा, मोसंबी, यासह बागायती शेती ही उध्वस्त झाली या संदर्भामध्ये महामहिम राज्यपाल महोदयांनी लक्ष घालण्याची विनंती करण्यात आली.    राज्याचे सरकार युवक व शेतकऱ्या

भारतीय क्रांती सेनेच्या प्रदेशाध्यक्ष वनिता चव्हाण हस्ते जिल्हा कार्यालयाचे उद्घघाटन करण्यात आले

Image
      औरंगाबाद (प्रतीनीधी)भारतीय क्रांती सेनेच्या प्रदेशाध्यक्ष वनिता चव्हाण हस्ते जिल्हा कार्यालयाचे उद्घघाटन करण्यात आले           याप्रसंगी अंबड तालुका अध्यक्षा इंदुमती जाधव यांनी मार्गदर्शन केले तर जिल्हा अध्यक्षा संगीता हानवते तालुका अध्यक्ष मंगल ऊफाडे‌  अमृता सावंत मनिषा चिंतामणी सखुबाई खकाळ प्रज्ञा साळवे शारदा खिल्लारे मनिषा बाविस्कर भाग्यश्री दाभाडे,सर्वांची दाभाडे उषा घोंगडे , संगीता पाचुंदे,स्वाती,खरातताई ,आदिउपस्तीत होत्या                या कार्यक्रमासाठी  परिसरातील महिला मोठया उपस्थित होत्या     यावेळेस भारतीय क्रांती सेनेच्या वतीने महिला सदस्यांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले        

मुलांना कामाला ठेऊ नये टि ई कराड -कामगार अधिकारी जालना मुलांना कामाला ठेवले आढळयास मालकावर व पालकावर गुन्हा नोंद करणार

Image
परतूर /प्रतिनिधी  सध्या देशात कोरोना थैमान असल्यामुळे सर्व शाळा बंद आहे मुले ही घरी आहे आशात पालक मुलांना काम वेबिगारी हॅटेल वर कामाला ठेवत आहे असे जिल्हा कामगार अधिकारी जिल्हा बाल संरक्षण कक्ष जालना चाईल्ड लाईन याच्या निदर्शनात आले त्यानी आज टिम करूण जुन्या मोढ्यातील विविध कापड दुकान हाॅटेल गोडाऊन यादि ठिकाणी भेटी देऊन दुकानदार याना सुचना देण्यात आली  हॅटेल चहा टपरी भेळ या ठिकाणी बालकामगार कामाला ठेऊ नये तसेच मुलाच्या अधिकाराना समजुन घेऊया बालमजुरी ही मुलाच्या विकासाला घातक आहे हे समजुन घेऊया आणि इतराना पटवुन देउया तसेच जालना जिल्हातील बालमंजुरी विरोधी लढ्यात सहभागी होऊया तसेच आपल्या स्वाता च्या घरात सोसायटी टॅवर मध्ये .कारखान्यात दुकानात 18 वर्षाखालील मुलांना कामाला न ठेवणे आपल्या आसपास कामावर ठेवलेल्या मुला मुलीचे कोणत्याही प्रकारचे शोषन होत असल्यास लगेच या बाबतची महिती आपल्या शहरातील जिल्हातील बाल कल्याण समिती  जिल्हा बाल संरक्षण कक्ष चाईल्ड याच्याशी संपर्क करा  अहवान जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री  शिवाजी नागरे  टि ई कराड  कामगार अधिकारी जालना यानी केले सोबत जिल्

तहसील कार्यालय ते काँलेज रोड दुरूस्ती करण्याची पाडेवार यांची मागणी,

Image
परतुर( प्रतिनिधी) परतुर शहरातील मुख्य रस्ता असलेला बसस्थानक , अग्निशामक दल, तहसिल कार्यालय ते काँलेज रोडवरील खड्डे बुजवून रस्ता दुरूस्ती करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार यांनी उपविभाग आधिकारी परतुर यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे,  दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की परतूर शहरातील एकमेव असलेला मुख्य रस्ता म्हणजे तहसील कार्यालय ते कॉलेज रोड ,मार्गे जाणारा रस्ता हायवे ला जोडणारा आहे तो रस्ता   अनेक दिवसांपासून खराब झालेला आहे, या रस्त्याच्या मध्यभागी जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून कोणता खड्डा चुकवा असे वाहन चालकांना कळत नाही या खड्ड्यांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसेच शहरातून परतुर ते मुंबई बस सुरू झाली असून ,या खराब रस्त्यामुळे बस चालकाला बस चालवणे देखिल कठीण झाले आहे, रस्त्यावरील पडलेल्या मोठ मोठ्या खड्ड्यात घाण पाणी साचलेले असुन पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडत आहे, सदर रस्त्याची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी अशी मागणी ही दिलेल्या निवेदनात अर्जुन पाडेवार यांनी केली आहे,

महाराष्ट्रातील मंदिरे तात्काळ उघडण्यात यावी याकरिता भारतीय जनता पार्टीच्या वतीने घनसावंगी तालुक्यातील देवी दहेगाव येथील रेणुका माता मंदिरात लाक्षणिक उपोषण_____________________________ भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील व माजी मंत्री आमदार बबनरावजी लोणीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली__________________________ भाजपा युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस राहुल भैय्या लोणीकर यांच्या सूचनेनुसार*

Image
       भाजपा घनसावंगी तालुक्याच्या  वतीने महाराष्ट्रातील मंदिरे चालू करण्यात यावी यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घनसावंगी तालुक्यातील देवी दहेगाव येथील रेणुका माता मंदिरात लाक्षणिक उपोषण 10 ते 2 वाजेपर्यंत करून घनसावंगी तहसीलदार यांचे प्रतिनिधी तलाठी श्री.देशमुख यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनात गेल्या साडे सहा महिन्यांपासून बंद असलेले मंदिराचे दरवाजे उघडावे याकरिता भारतीय जनता पार्टीने वेळोवेळी आंदोलने केली मंदिरे उघडणे हा केवळ हिंदुत्व हा विषय नसून मंदिरावर लाखो लोकांचा जीवन उध्दाराचा प्रश्न निर्माण झाले आहे तरीही  महाविकास आघाडी सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही त्यामुळे भाजपाच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले यावेळी उपस्थित भाजपा अ.जा.प्रदेश उपाध्यक्ष सर्जेराव दादा जाधव,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ह.भ.प.रमेश महाराज वाघ,भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अंकुशराव बोबडे,भाजपा ता.अध्यक्ष संजय तौर,किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस कैलासराव शेळके,किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव पांढरे,भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गोविंद ढेंबरे,अ.जा मोर्चा जिल्हा उपाध्य

परतुर नगरपालिकेच्या सफाई कर्मचारी यांनी मांडल्या पाडेवार यांच्या कडे व्यथा

Image
परतुर प्रतिनिधी -  जालना जिल्ह्यातील परतुर नगरपालिकेच्या सर्व सफाई कर्मचारी यांनी सोमवार रोजी विविध समस्या बाबतीत सामाजिक कार्यकर्ते तथा पञकार अर्जुन पाडेवार यांची त्याच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.     सध्या गेल्या सहा महिन्यापासून कोरोना रोगामुळे सर्व सामान्य जनता हैरान असुन या कठीण  काळामध्ये नगरपालिकेच्या सर्व कर्मचारी यांनी पुर्ण परतुर शहरातील साफसफाई साठी मोलाची कामगिरी बजावली आहे. तसेच काँट्रॅक्ट दार यांनी महीण्याच्या १ तारखेला चा पगार करावी  महिन्याच्या महिन्याला पगार केली तर चागले होईल, पगार वेळीच  झाले नाही तर गोरगरीब कर्मचारी यांना उसनवारी करून मुलाबाळांचे पोट भरावे लागत आहे,. अनेक कर्मचारी नगरपालिकेत गेल्या तिस वर्षापासुन आपली सेवा बजावत आहेत, या मध्ये अनेक कर्मचारी कायमस्वरूपी होण्याची वाट पाहून मयत सुध्दा  झाले आहे. जे कर्मचारी मयत झाले आहे त्यांच्या जागी बदलीवर त्यांच्या वारसाला कामावर घेण्यात यावे, जे कर्मचारी आपली सेवा बजावित असतांनाच आजारी पडले आहेत त्यांच्या बद्दल्यात त्याच्यां च  वारसाला कामावर घ्यावे, तसेच काँट्रॅक्ट दारांनी लावलेला मुकादम कामावर येणा

आज होणाऱ्या शेतकरी बचाव अंदोलनाच्या virtual रॅलीत मोठया संख्येने सहभागि व्हा-मा.आ. जेथलीया

Image
आज मा.आ. सुरेशकुमारजी जेथलिया जनसंपर्क  कार्यालयात काँग्रेस पक्षाच्या वतीने होणाऱ्या शेतकरी बचाव रॅली संदर्भात पूर्वतयारी ची पाहणी करतांना मा.आ.सुरेशकुमारजी जेथलिया ,तालुका अध्यक्ष बाबासाहेब गाडगे,राजेश भुजबळ,बाळू काका ढवळे ....याप्रसंगी शेतकरी बांधवांनी उद्या होणाऱ्या दुपारी 3 वाजता virtual रॅली मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले

परतूर येथे महिला अत्याचाराविरोधात भाजपा महिला आघाडीचे तहसील कार्यालयासमोर आंदोलन* ======================= *सरकार महिला अत्याचाराबाबत गंभीर नाही* *आमदार लोणीकर यांचा आरोप* ======================= *महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी*

Image
परतूर प्रतिनिधी राज्यातील आघाडी सरकार महिलांच्या अत्याचाराच्या संदर्भात गंभीर नसल्याचा आरोप माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे पुढे या पत्रकात म्हटले आहे की राज्यातील गृहखाते संवेदना हरवलेले असून गृहमंत्र्यांची या गोष्टीकडे लक्ष नसल्यामुळे राज्यामध्ये अनेक ठिकाणी बलात्कार अत्याचार विनयभंग अशा प्रकार चा अन्याय महिलांवर होत असून  कोविड सारख्या महाभयंकर रोगाचा प्रादुर्भाव राज्यभरात असताना पनवेल येथे कोविड  सेंटरमध्ये 40  वर्षीय कोरोनाग्रस्त महिलेचा बलात्कार होतो ही गोष्ट अतिशय घृणास्पद असून राज्यात होणाऱ्या अशा प्रकारच्या घटनांना पायबंद घालण्यात हे सरकार अपयशी ठरले असून सरकारला महिलांच्या बाबतीत कुठल्याही गोष्टीची घेणंदेणं नसल्याचे ही ते म्हणाले   राज्यातील सरकार कुंभकर्णी झोपेत असून ,महिला अत्याचार,अतिवृष्टी, महापूर या मुळे जनता हैराण असून सरकार मात्र या कडे डोळझाक करीत असल्याचे ते म्हणाले.   हे सरकार संवेदनाशुन्य असून या सरकारला जनतेनेच दुःख समजून घेत नसल्याने जनतेमध्ये तीव्र असंतोष असल्याचे सांगतानाच कोरोना सारख्या संवेदनशील विषयावर सरकार गंभीर नसून सरकारला

पाहणी पंचनामे बस्स झाले, शेतकऱ्यानं तात्काळ आर्थिक मदतीची गरज -सचिन खरात* *परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ*

Image
जिल्ह्यासह परतूर तालुक्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निघून गेला तरीही जर सरकार आणि प्रशासन पाहणी आणि पंचनामे करत बसणार असेल तर तुमचे पाहणी, पंचनामे बस्स झाले आता शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदतीची गरज असून सरकारने लवकरात लवकर मदत करावी अन्यथा शिवसंग्राम  विद्यार्थी संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसंग्रामचे विद्यार्थी तालुका अध्यक्ष शेतकरी पुत्र सचिन खरात यांनी दिला आहे.   जिल्ह्यासह तालुक्यामध्ये पाऊस चांगला झाल्याने पिके जोरदार आली होती शेतकऱ्यामध्येही पिके चांगली आल्याने आनंदाचे वातावरन होते मात्र  पिके काढणीस सुरुवात झाली कापूस वेचणीस सुरुवात झाली अन् परतीच्या पावसाने होत्याचे नव्हते करून टाकले शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून घेतला. यामुळे शेतकरी वर्ग फार चिंतेत असून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज आहे त्यामुळे शेतकऱ्यांच दुःख समजून घेत सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक पॅकेज जाहीर करून मदत करावी. राज्य सरकार नुसते पाहणी, पंचनामे करत असून आश्वासनाचे गाजर दाखवने सरकारने बंद करावे